पंतप्रधान मोदी यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा, केलं महत्त्वाचं आवाहन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रशियाने गुरूवारी रणशिंग फुंकत युक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्यात आत्तापर्यंत 100 हून अधिक जणांचा जीव गेला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी ही माहिती दिली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. युक्रेनमधील हिंसा थांबवावी असं आवाहन मोदी यांनी पुतिन यांना केलं. एवढंच नाही तर रशियाने धोरणात्मक चर्चेतून हा प्रश्न सोडवावा असंही त्यांनी सुचवलं आहे.

ADVERTISEMENT

नेमकी काय झाली चर्चा?

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री फोनवरुन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली, असं या फोनवरील चर्चेसंदर्भातील माहिती देणाऱ्या पत्रकारच्या पहिल्या परिच्छेदात म्हटलंय. यावेळी पुतिन यांनी सध्या घडलेल्या घडामोडींबद्दल पंतप्रधान मोदींना सविस्तर माहिती दिली. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी, ‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडविता येऊ शकतात,’ या भूमिकेचा पुनरूच्चार करून हिंसाचार थांबविण्याचे आवाहन पुतिन यांना केल्याचं मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.

लोकशाही मार्गाने आणि चर्चेमधून वाटाघाटी करुन हा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत’ असंही पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्याशी बोलताना सांगितल्याचं मंत्रालयाचं म्हणणं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

युक्रेनमध्ये सध्या हजारो भारतीय नागरिक आणि विद्यार्थी अडकलेले आहेत. या विद्यार्थी आणि नागरिकांना भारतात परत आणण्याविषयीची चिंताही पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्याकडे व्यक्त केली.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचे रशियापासून पाच हजार किलोमीटर्सवर भारतात राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांवरही परिणाम होणार आहेत. युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यास भारताचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही मोदी यांनी यावेळी नमूद केले. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या देशांमधील अधिकारी आणि संबंधित व्यक्ती या प्रकरणासंदर्भात सतत संपर्कात राहतील यावर शिक्कामोर्तबही केल्याचं सांगण्यात आलं आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी तेथील भारतीय दुतावासाने गुरुवारी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या. लष्करी कायदा लागू झाल्याने तिथे वाहतुकीत अडथळे येत असल्याने घरीच थांबण्याचे आवाहन दुतावासाने भारतीयांना केले. आपल्याला मायदेशी परत पाठविण्यासाठी दूतावासाकडून प्रयत्न करण्यात येत असून, तोपर्यंत घरातच थांबा, तसेच जवळच्या बॉम्बरोधक शिबिरांमध्ये आसरा घ्या, अशी सूचना राजदुतांनी केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT