प्रीतम मुंडेचा भाजपला घरचा आहेर, ‘स्व.मुंडे साहेबांचा फोटो वगळून…’

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

pritam munde slams bjp gopinath munde photo missing on mahayuti melava banner beed news
pritam munde slams bjp gopinath munde photo missing on mahayuti melava banner beed news
social share
google news

भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. स्व.मुंडे साहेबांचा फोटो वगळून जर कुठले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर ते सहन करणार नाही, असा इशारा देखील प्रीतम मुंडे यांनी पक्षाला दिला आहे. मुंडे साहेबांचा फोटो प्रोटोकॉलमध्ये नाही हे कारण मनाला पटत नाही, अशी खंत देखील प्रीतम मुंडे यांनी बोलून दाखवली. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती होती. (pritam munde slams bjp gopinath munde photo missing on mahayuti melava banner beed news)

ADVERTISEMENT

बीडमध्ये आज भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोमिलन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होते. बीडमधल्या महायुतीच्या या मेळाव्यातील कार्यक्रमाच्या स्टेजवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नसल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. कार्यकर्त्यांच्या या नाराजीनाट्यानंतर तात्काळ आयोजकांवर बॅनर बदलावे लागले. या प्रकरणावरुन आता प्रीतम मुंडेंनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : Milind Deora : ‘हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है!’, CM शिंदेंनी कुणाला दिला इशारा

मुंडे साहेबांचा फोटो भाजपाच्या प्रोटोकॉल मध्ये येत नाही का.? बीड जिल्ह्यामध्ये भाजपने स्व.मुंडे साहेबांचा फोटो वगळून जर कुठले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर ते सहन करणार नाही.. मुंडे साहेबांच्या नावाशिवाय महाराष्ट्रातील कुठलेही मोठी घडामोडी घडत नाही.. त्या मुंडे साहेबांचा फोटो प्रोटोकॉल मध्ये नाही हे कारण मनाला पटत नाही, अशी खंत देखील प्रीतम मुंडे यांनी बोलून दाखवत भाजपला घरचा आहेर दिलाय.तर हा प्रशासकीय कार्यक्रम नव्हता.. त्यामुळे असे करणे चुकीचे आहे, असे देखील प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत.

हे वाचलं का?

दरम्यान, या कार्यक्रमात अजित पवार गटाचे बीड विधानसभा प्रमुख योगेश क्षीरसागर यांचा फोटो नसल्यानेही मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी योगेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. एकूणच या संपुर्ण प्रकारामुळे बीडमधील महायुतीत नेमकं चाललंय काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.

हे ही वाचा : Milind Deora : “जर मोदी म्हणाले की, काँग्रेस चांगला पक्ष तर…”, देवरांचा ठाकरे-काँग्रेसवर वार

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT