प्रियंका गांधींचा आसाम दौरा रद्द, काही दिवस राहणार होम आयसोलेशनमध्ये

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचा आसाम दौरा रद्द करण्यात आला आहे. काही दिवस त्या होम आयसोलेशन राहणार आहेत. प्रियंका गांधी यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मी काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहे, या असुविधेसाठी मी आपली दिलगिरी व्यक्त करते. आसाममध्ये काँग्रेसचा विजय होईल अशी प्रार्थना करते असंही ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

पाहा प्रियंका गांधी यांनी ट्विट केलेला व्हीडिओ

प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटव्ह आली आहे. तर प्रियंका गांधी यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र एक व्हीडिओ शेअर करून प्रियंका गांधी यांनी आपण होम आयसोलेशनमध्ये राहणार आहोत असं स्पष्ट केलं आहे. तसंच आसामचा दौराही रद्द केला आहे. रॉबर्ट वाड्रा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आपण आपला दौरा रद्द केला आहे असंही प्रियंका गांधींनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

प्रियंका गांधी या आसाममध्ये तीन सभा घेणार होत्या. दुपारी १२ वाजता गोलपारा या ठिकाणी, दुपारी दीड वाजता गोलकगंज आणि दुपारी साडेतीन वाजता सरूखेत्री या ठिकाणी सभा घेणार होत्या. मात्र आता त्यांनी होम आयसोलेशनचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT