दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा – राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकेंड लॉकडाउनची घोषणा केली. या लॉकडाउनची घोषणा करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीवस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन संपर्क साधत त्यांच्या सहकार्याची मागणी केली होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीबद्दलची माहिती देण्यासाठी राज ठाकरेंनी आज आपल्या निवासस्थानी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी लॉकडाउन संदर्भात राज्यातील विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं. सध्या चर्चेत असलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसदर्भात बोलत असताना राज ठाकरेंनी या विद्यार्थ्यांनाही प्रमोट करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ADVERTISEMENT

“सध्या दहावी-बारावीचे विद्यार्थी कोणत्या मानसिकतेमधून जात असतील याची आपल्याला कल्पनाही नाही. कुठून अभ्यास करणार, कशी परीक्षा देणार, त्याला निकाल कधी लागणार..कसा लागणार याची आपल्याला कल्पनाही नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सरळ प्रमोट करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या विद्यार्थ्यांनाही प्रमोट करण्यात यावं.” राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते.

विद्यार्थ्यांनो घाबरु नका, Lockdown चा १० वी आणि १२ वी च्या परीक्षांवर परिणाम होणार नाही

हे वाचलं का?

यादरम्यान लॉकडाउन काळात पालकांवर पडत असलेल्या शाळेच्या फी बद्दलचा मुद्दाही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याचं सांगितलं. अनेक पालकांचे या काळात जॉब गेले आहेत…त्यामुळे त्यांच्याकडे पैसेच नसीतल तर शाळांची फी भरणार कुठून. या सर्व मुद्द्यांवर राज्य सरकारने तोडगा काढणं गरजेचं असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. तसेच राज्य सरकारच्या ब्रेक द चेन नियमांमध्ये असलेल्या विसंगतीबद्दलची राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना काही सूचना केल्या, ज्यावर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना दिलं आहे.

सत्ताधाऱ्यांची माणसं दिवसाढवळ्या खून करतायत! – राज ठाकरे संतापले

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT