महाराष्ट्राला आणखी 200 मेट्रिक टन Oxygen पुरवा, राज्य सरकारची केंद्राला विनंती
मुंबई: महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये संसर्ग झपाट्याने वाढत असून ऑक्सिजनची अत्यंत निकडीने गरज भासत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्याला जवळच्या आणि सोयीच्या ठिकाणाहून ऑक्सिजन पुरवठा लगेच सुरु करण्यात व्यक्तिगत लक्ष घालावे अशी विनंती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना केली आहे. त्यासाठी त्यांनी एका सविस्तर पत्र लिहून राज्यातील कोरोनाची […]
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये संसर्ग झपाट्याने वाढत असून ऑक्सिजनची अत्यंत निकडीने गरज भासत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्याला जवळच्या आणि सोयीच्या ठिकाणाहून ऑक्सिजन पुरवठा लगेच सुरु करण्यात व्यक्तिगत लक्ष घालावे अशी विनंती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना केली आहे. त्यासाठी त्यांनी एका सविस्तर पत्र लिहून राज्यातील कोरोनाची नेमकी स्थिती आणि त्यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता याबाबत माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
पॉवरफूल मंत्री ऑक्सिजन आणि इंजेक्शनचा साठा आपल्याकडे वळवत आहेत – फडणवीसांचा आरोप
काय म्हटलं आहे सीताराम कुंटे यांनी पाठवलेल्या पत्रात?
हे वाचलं का?
महाराष्ट्राला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला आहे. महाराष्ट्रा आज घडीला 6 लाख 63 हजार 758 सक्रिय रूग्ण आहेत. त्यापैकी 78 हजार 884 रूग्ण हे ऑक्सिजन बेडवर आहेत, त्यापैकी 24 हजार 787 रूग्ण हे आयसीयूमध्ये आहेत.
महाराष्ट्रातल्या पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या 16 जिल्ह्यांमध्ये कोरोना केसेस वाढत आहेत. या सोळाही जिल्ह्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासते आहे. आम्ही या प्रत्येक जिल्ह्याचं ऑक्सिजन ऑडिटही करतो आहे. तसंच त्यांची ऑक्सिजनची मागणी पुरवण्याचा प्रयत्नही करतो आहोत.
ADVERTISEMENT
तरीही या जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्ण सातत्याने वाढत आहेत. मेडिकल ऑक्सजिनची मागणीही वाढते आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आम्हाला आणखी 200 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवण्यात यावा. RINL, विझग आणि जिंदाल स्टिल प्लांट या ठिकाणाहून ऑक्सिजन पुरवतो हे आश्वासन कागदावरच राहिलं आहे.
ADVERTISEMENT
सांगलीत भयावह स्थिती ! मालवाहू रिक्षेत ऑक्सिजन लावून पेशंटची बेड शोधण्यासाठी ससेहोलपट
माझी आपल्याला विनंती आहे की जामनगर गुजरातवरून सध्या जो 125 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवण्यात येतो आहे त्याचा पुरवठा 225 मेट्रिक टन इतका करावा. तसंच भिलई वरून जो 130 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला जातो आहे त्याचा पुरवठा 230 मेट्रिक टन इतका करावा ही दोन्ही ठिकाणी भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राला जवळ आहेत असंही सीताराम कुंटे यांनी त्यांच्या पत्रात नमूद केलं आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्राला 10 LMO टँकर्सही पुरवावेत जेणेकरून महाराष्ट्राला अंगुलवरून रोरो सिस्टिमने ऑक्सिजन मागवता येईल. तुमच्याकडून कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी वारंवार सहकार्य मिळतं आहे तसंच सहकार्य यापुढेही मिळेल अशी अपेक्षा आहे असंही सीताराम कुंटे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT