पुण्यात रिक्षा चालकांचं आंदोलन चिघळलं; दंगल नियंत्रण पथक दाखल : काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : बाईक टॅक्सीवरील बंदी आणि विविध मागण्यांसाठी पुण्यातील रिक्षा चालकांनी पुकारलेलं आंदोलन आता चिघळलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. तसंच रिक्षा चालकांच्या या आंदोलनामुळे पुणे शहरातील ट्रॅफिकवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.

ADVERTISEMENT

नेमकं काय घडलं? :

शहरातील आरटीओ कार्यालयासमोर रिक्षा चालकांनी सकाळी ११ वाजता आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर दुपारी ३ वाजता, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, मात्र ही चर्चा अयशस्वी ठरली. तेव्हापासून रिक्षा चालकांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं. इतकंच नाही तर प्रशासनानं या आंदोलनाची दखल घ्यावी यासाठी रिक्षा चालक रिक्षा रस्त्यावर ठेवून घरी निघून गेले.

रिक्षा चालकांनी रस्ता जाम केल्यानं पुणेकरांचा खोळंबा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आंदोलनामुळे आर. टी. ओ. कार्यालय चौकातील वाहतूक बंद आहे. तसंच संचेती हॉस्पिटल ते पुणे रेल्वे स्टेशन, जुना बाजार चौक ते आर. टी. ओ. कार्यालय, जहांगीर हॉस्पिटल चौक ते संचेती हॉस्पिटल हे रस्ते बंद आहेत.

हे वाचलं का?

सध्या वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी आंदोलन परिसरात पोलीस संरक्षण वाढवलं आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना पोलीस म्हणाले, आमची त्यांना विनंती होती की जनतेला वेठीस धरु नका, मात्र त्यांनी त्यांची भूमिका कायम ठेवली. आम्ही त्यांना थोडं मागं ढकललं, त्यावेळी त्यांनी सहकार्य केलं आहे, पुढे काय होतं बघू. दरम्यान, रिक्षा चालकांनी त्यांच्या रिक्षा मागे न घेतल्यास पोलीस स्वतः या रिक्षा मागे घेण्याच्या तयारी असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT