पुणे पुन्हा हादरलं! व्हिडीओ बघून अल्पवयीन भावाचा 3 वर्षाच्या सख्ख्या बहिणीवर बलात्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात महिला अत्याचार आणि गुन्हेगारीविषयक घटना सातत्याने घडत आहेत. मात्र, पालकांना धक्का बसावा अशी एक घटना भोसरी परिसरात घडली आहे. एका विधीसंघर्ष मुलाने सख्ख्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतरही पीडित मुलीच्या आईवडिलांनाही धक्का बसला.

ADVERTISEMENT

या घटनेविषयी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी माहिती दिली. पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय विधीसंघर्षग्रस्त भावाने तीन वर्षाच्या सख्ख्या चिमुकल्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. अभ्यास करत असताना युट्युबवरील अश्लील व्हिडिओ पाहूनच हे अश्लील कृत्य केल्याची कबुली त्याने आपल्या आई-वडिलांना दिली. हा सर्व प्रकार ऑगस्ट महिन्यात घडलेला असून, आता तो समोर आला आहे.

आईवडिल कामावर गेल्यानंतर काय घडलं?

हे वाचलं का?

ऑगस्ट महिन्यात भाऊ बहीण (विधीसंघर्षग्रस्त मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी) घरी होते. आईवडिल कामावर गेल्यानंतर भावाने वडिलांच्या मोबाईलमध्ये युट्यूबवर अश्लील चित्रफित पाहिली. त्यानंतर घरात एकट्याच असलेल्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकारानंतर चिमुकलीला वेदना होऊ लागल्या. त्यामुळे आई-वडिलांनी तिला उपचाराकरिता पिंपरीतील एका रुग्णालयात दाखल केलं.

डॉक्टरांनी तपासणी करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर मुलीला विश्वासात घेऊन तिच्या आई-वडिलांनी या अत्याचाराबाबत विचारलं. त्यावर मोठ्या दादानेच हे कृत्य केल्याचं तिने आई-वडिलांना सांगितलं. या प्रकारानंतर पिंपरीतील सरकारी रुग्णालयाच्या मार्फत भोसरी पोलिसांना या गुन्ह्याची माहिती मिळाली.

ADVERTISEMENT

पोलीस पीडितेच्या घरी गेले असताना कुटुंबियांनी तक्रार करण्यास नकार दिला. ‘मुलगा आणि मुलगी दोन्ही आमच्याच रक्ताचे आहेत. आम्हाला कोणाविरुद्धही तक्रार द्यायची नाही’, अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली. आईवडिलांनी नकार दिल्यानंतर पोलिसांनी या पालकांचे मन परिवर्तन करून त्यांना तक्रार देण्यासाठी तयार केले.

ADVERTISEMENT

आता भोसरी पोलीस ठाण्यात युट्युबवरील अश्लील व्हिडिओ पाहून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विधी संघर्षग्रस्त 14 वर्षाच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपूर्वीच शेजारी राहणाऱ्या बारा वर्षाच्या मुलाने चार वर्षाच्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा चिखली पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची घटना चर्चेत असतानाच आता अशाच पद्धतीची घटना घडल्यानं पालकही धास्तावले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT