पुणे : रात्रभर टिव्ही राहिला सुरू… पत्नीचा घेतला जीव; पतीने गळा आवळून केली हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रागात माणूस काय करेल यांचा नेम नाही. कधी कधी रागाच्या भरात माणसं जीवही घेतात. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. पण, हत्या करण्याचं कारण अत्यंत शुल्क असंच होतं. पतीकडून चुकीने रात्रभर टिव्ही सुरूच राहिला. त्यामुळे पत्नीने रागाच्या भरात तिचा जीवच घेतला.

ADVERTISEMENT

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील चांदिवडीत ही घटना घडली आहे. एका २६ वर्षीय आरोपींनी २० वर्षीय पत्नीचा खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, दोघांना एक मुलगीही आहे.

रात्रभर टिव्ही सुरू ठेवल्याच्या रागातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मूळ कारण मुलगी झाल्याचं आहे. योगेश जाधव असं आरोपीचं नाव असून, झालं असं की, दाम्पत्याला मुलगी झाली. मुलगी झाल्यानं योगेश जाधव नाराज झाला होता.

हे वाचलं का?

मुलगी झाली म्हणून मागील काही दिवसांपासून योगेश जाधव नाराज होता. त्यातूनच त्याने पत्नीचा छळ करणं सुरु केलं. तो पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करायचा. त्यावरून दोघांमध्ये वादही होत होते.

ADVERTISEMENT

हे सगळे वादविवाद सुरू असतानाच एक दिवस घरातील टिव्ही रात्रभर सुरूच राहिला. हे बघून संतापलेल्या योगेश जाधवने पत्नीची गळा आवळून हत्या केली. शिरगाव पोलिसांनी या घटनेबद्दलची माहिती दिली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी योगेश जाधव घटनास्थळावरून फरार झाला. नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची चौकशी केली जात आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT