Pune Bogus Doctor: कम्पाउंडरने ‘असं’ सुरु केलं होतं स्वत:चं हॉस्पिटल, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
शिरूर: डॉक्टरांच्या (Doctor) हाताखाली काम करणाऱ्या एका कपांऊडरने (Compounder) चक्क स्वतःचंच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल (Hospital) सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरुरमध्ये नुकताच समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 22 बेडचे हे हॉस्पिटल मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. तरीही त्यावर कुणालाही संशय आला नाही. कपांऊडरने बोगस नाव आणि बनावट वैद्यकीय पदवी तयार करून हे […]
ADVERTISEMENT
शिरूर: डॉक्टरांच्या (Doctor) हाताखाली काम करणाऱ्या एका कपांऊडरने (Compounder) चक्क स्वतःचंच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल (Hospital) सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरुरमध्ये नुकताच समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 22 बेडचे हे हॉस्पिटल मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. तरीही त्यावर कुणालाही संशय आला नाही. कपांऊडरने बोगस नाव आणि बनावट वैद्यकीय पदवी तयार करून हे हॉस्पिटल सुरू केलं होतं. एवढंच काय तर त्याने कोरोना रुग्णांसाठी त्याने स्वतंत्र कोव्हिड वार्डही (Covid-19 Ward) देखील तयार केला होता. अशी माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे.
ADVERTISEMENT
पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये हे रुग्णालय चालवलं जात होतं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तो मूळचा नांदेड जिल्ह्यातील असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
प्रेयसीला पेटवणाऱ्या प्रियकराचाच मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना
हे वाचलं का?
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला कपांऊडरचं बोगस डिग्री आणि नाव बदलून रुग्णालय चालवत असल्याची गुप्त माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असता डॉ. महेश पाटील नावाने आरोपी रुग्णालय चालवत असल्याचं समोर आलं. पोलिसांना त्याच्याकडे MBBS चं पदवी प्रमाणपत्र देखील आढळून आलं. पण जेव्हा पोलिसांनी अधिक चौकशी केली तेव्हा. डॉ. महेश पाटील अशी कुणीही व्यक्ती इथं डॉक्टर नसल्याचं समोर आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं मूळ नाव हे मेहबूब शेख असल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. तो नांदेड जिल्ह्यातील पीरबुऱ्हाण नगरचा रहिवासी आहे. संपूर्ण चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT
४७ लाख किंमतीची अवैध अफूची शेती, तिघांना अटक
ADVERTISEMENT
मेहबूब शेख ते डॉ. महेश पाटील…
शिरूरमध्ये डॉक्टर असल्याचं दाखवून 22 बेडचं स्वतः रुग्णालय चालवणाऱ्या कंपाऊडरची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.
याविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट म्हणाले, ‘पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आलं की, मेहबूब शेख हा कपांऊडर म्हणून काम करायचा. नांदेडमधील एका हॉस्पिटलमध्ये तो कामाला होता. काम करत असताना त्याला असं वाटलं की, वैद्यकीय कौशल्य आपण शिकलो आहोत. त्यानंतर त्याने शिरूरमध्ये दोन वर्षांपूर्वी मोरया मल्टीस्पेशालिटी रुग्णालय MBBSची बनावट डिग्री तयार केली आणि नावही बदललं. त्याने बनावट डिग्री आणि आधारकार्ड कोठून मिळवलं याचा तपास आम्ही करत आहोत. महत्त्वाचं म्हणजे काही काळ त्याने कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र वार्डही सुरू केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे,’ असं घनवट यांनी सांगितलं.
याप्रकरणी पोलिसांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टरसह या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या इतर लोकांविरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. (pune police arrest compounder multi specialty hospital starts on bogus degree basis)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT