कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत फार्महाऊसमध्ये डान्सबार, पोलिसांनी १३ जणांना घेतलं ताब्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउनची घोषणा केली आहे. यामुळे मुंबई, ठाणे, पनवेल परिसरातील अनेक डान्सबार बंद आहेत. बारमालकांनी परिस्थितीचा फायदा घेत ग्रामीण महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला आहे. भोर तालुक्यातील केळवडे गावातील फार्महाऊसवर सुरु असलेल्या डान्सबारवर पोलिसांनी छापेमारी केली आहे.

ADVERTISEMENT

मुंबई आणि ठाणे परिसरातील मुलांनी या फार्महाऊसवर आणून डान्सपार्टी सुरु असल्याचं पोलिसांच्या कारवाईत समोर आलं. लॉकडाउन आणि कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाईत करत १३ मुला-मुलींना ताब्यात घेतलं आहे. या प्रकारात पुणे शहरातल्या काही बड्या व्यक्तींची नावं समोर येत असल्याचं कळतंय.

केळवडे गावातील सुमीत साप्ते यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर रंगीबेरंगी लाईट आणि मोठ्या आवाजात साऊंड लावत मुलं-मुली पार्टी करत असल्याची माहिती राजगड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली. यावेळी पोलीस पथक कारवाईसाठी पोहचलं असता मुलींवर पैशाची उधळण सुरु असल्याचं पहायला मिळालं. पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणांवरुन आलेल्या ५ तर ठाणे जिल्ह्यातील एका मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT