हे लोक काँग्रेसला घाबरतात, कारण…; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिल्लीत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसविरुद्ध भाजप यांच्यात शाब्दिक घमासान बघायला मिळत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकेचे बाण डागले. राहुल गांधींच्या टीकेचा समाचार घेत पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरूंपासूनच्या कामाचे दाखले देत काँग्रेसवर निशाणा साधला.

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींवर पलटवार करत मोदी आणि भाजपला लक्ष्य केलं.

PM Modi Lok Sabha speech: लोकसभेत राहुल गांधींचे 9 हल्ले, PM मोदींचे पलटवार

हे वाचलं का?

राहुल गांधी म्हणाले, ‘मी तीन गोष्टींबद्दल बोललो होतो. मी म्हणालो होतो, दोन भारत बनवले जात आहेत. एक गरिबांचा भारत, दुसरा श्रीमंतांचा भारत. देशातील स्वायत्त संस्थांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं मी म्हणालो होतो. त्याचबरोबर पाकिस्तान आणि चीन एकत्र आले असून, ते भारतासाठी धोक्याचं असल्याचं बोललो होतो,’ असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

‘मी मांडलेल्या तीन गोष्टींवर पंतप्रधान मोदींनी कोणतंही उत्तर दिलं नाही. मी आधीही बोललो होतो की, कोरोना धोकादायक आहे. पण पंतप्रधानांनी माझं ऐकलं नाही. चीन आणि पाकिस्तानकडून भारताला धोका आहे, त्यांनी ही गोष्टही गांभीर्याने घेतली नाही. हे काही मस्करी नाहीये. पंतप्रधान मोदी नेहरूंनी केलेली कामं सांगत राहिले, पण त्यांनी स्वतः केलेली कामं नाही सांगितली’, असा टोला राहुल गांधींनी मोदींना लगावला.

ADVERTISEMENT

काँग्रेस नसती तर? काय झालं असतं पंतप्रधानांनी यादी वाचत चालवले टीकेचे बाण

ADVERTISEMENT

‘नेहरुंनी देशाची सेवा केली. माझ्या पणजोबांना जे करायचं होतं, ते त्यांनी केलं. ते देशातील लोकांना माहिती आहे. त्यामुळे कोण काय बोलतंय त्यांची मला चिंता नाही. पण, हे लोक काँग्रेसला घाबरतात. कारण काँग्रेस सत्य बोलते. त्यांचा धंदा मार्केटिंगचा आहे. पुर्ण भाषण काँग्रेसवर दिलंय. काँग्रेसने काय केलं नाही, हे सांगितलं. पण त्यांनी जी आश्वासनं दिली होती, त्याबद्दल काहीच बोलले नाही. थोडीफार का असेना पण भीती आहे,’ असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

वांद्रे स्थानकावर मजुरांची गर्दी काँग्रेसने जमवली होती?; पोलिसांनी कुणाला केली होती अटक?

‘त्यांनी खोटं पसरवून ठेवलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनात भीती आहे. हीच भीती संसदेत स्पष्टपणे दिसली. पंतप्रधानांचं पूर्ण भाषण काँग्रेसवर होतं. त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल भीती आहे’, अशी टीका राहुल गांधींनी केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT