Porn Film Case : राज कुंद्राला कुठलाही दिलासा नाही, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी अर्थात पॉर्नोग्राफी प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. पॉर्न प्रकरणी राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ होतानाच दिसते आहे. राज कुंद्रासोबत त्याचा सहकारी रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. तर राज कुंद्राचे वकील सुभाष जाधन यांनी राज […]
ADVERTISEMENT
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी अर्थात पॉर्नोग्राफी प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. पॉर्न प्रकरणी राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ होतानाच दिसते आहे. राज कुंद्रासोबत त्याचा सहकारी रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. तर राज कुंद्राचे वकील सुभाष जाधन यांनी राज कुंद्राच्या जामिनासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेवर उद्या सुनावणी पार पडणार आहे.
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने 20 जुलैला अटक केली आहे. पोर्नोग्राफीच्या आरोपांखली अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राविरेधात पोलिसांच्या हाती अनेक पुरावे लागले आहेत. राज कुंद्राला अटक झाल्यापासून या प्रकरणात नवे खुलासे होत आहेत. ज्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी चांगल्याच वाढताना दिसत आहेत.
20 जुलैला राज कुंद्राला अटक झाल्यानंतर त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलिस चौकशीत राज कुंद्रा विरोधात अनेक पुरावे हाती लागले. त्यानंतर 23 तारखेच्या सुनावणीत 27 जुलै पर्यंत राज कुंद्राची पोलीस पोलिस कोठडी वाढवण्यात आली होती. आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पॉर्न फिल्म प्रकरणा राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या बँका खात्यांची देखील मुंबई गुन्हे शाखेने चौकशी केली असता खळबळजनक माहिती समोर आली आहे. राज कुंद्राच्या बँक खात्यांमधून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होत असल्याचं उघड झालंय.
हे वाचलं का?
HotShot या अॅपबद्दल आणि पॉर्न प्रकरणी शिल्पा शेट्टीचीही चौकशी झाली आहे. तिला हे सगळे प्रकार माहित होते का असा प्रश्न पोलिसांनी विचारला त्यावेळी आपण या प्रकारापासून अनभिज्ञ आहोत असं उत्तर शिल्पाने दिलं.
शिल्पा शेट्टीने काय उत्तर दिलं?
ADVERTISEMENT
शिल्पा शेट्टी म्हणते, ‘HotShot या अॅपवर येणारे चित्रपट अश्लील नसून इरॉटिक चित्रपट आहेत. यापेक्षा जास्त अश्लील चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यास मिळतात. पण माझा याच्याशी काहीही संबंध नाही. हॉटशॉटबाबत मला काहीही माहित नाही’ असं उत्तर शिल्पाने दिलं आहे. शिल्पा शेट्टी राज कुंद्राच्या कंपनीत डायरेक्टर म्हणून काम करत होती. पण तिने या पदाचा राजीनामा दिला आहे. असं असलं तरीही मला हॉटशॉटशी काहीही घेणंदेणं नाही असं तिने आता म्हटलं आहे. तसंच राज हा अश्लील चित्रपट बनवण्यात सहभागी नव्हता असंही शिल्पा शेट्टीने म्हटलं आहे. एवढंच नाही तर मला काहीही माहित नाही असंही शिल्पा शेट्टीने म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT