राज ठाकरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत साजरी केली दिवाळी; मनसे अध्यक्षांनी मुलांना दिला शब्द

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी केली आहे. यावेळी राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी यांनी या मुलांना खाऊचे वाटप केले. त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंसोबत दिवाळी साजरी करण्याची या मुलांची इच्छा होती. राज ठाकरेंना संपर्क साधला असता राज यांनी या मुलांना शिवतीर्थवर बोलवून घेतले आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.

ADVERTISEMENT

राज ठाकरे यांनी या मुलांना दिला शब्द

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शाळा असावी अशी मागणी या मुलांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांना बोलून हा प्रश्न नक्की मार्गी लावण्यात येईल, असा शब्द राज ठाकरेंनी दिला आहे. राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी ही मुलं टाळ वाजवत विठुरायाचे नामस्मरण करत दाखल झाले. या दरम्यान राज ठाकरेंनी आणि शर्मिला ठाकरे यांनी या मुलांसोबत भरपूर गप्पा देखील मारल्या. यावेळी या मुलांसोबत त्यांच्या नातेवाईकांसह महंत देखील उपस्थित होते. फराळासह राज ठाकरे यांनी मुलांना किराणा सामान देखील दिल्याचं मुलांनी सांगितलं.

राजकीय नेत्यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी

यदांची दिवाळी राजकीय नेत्यांनी मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. राज्यातून जवळपास 50 पेक्षा जास्त शेतकरी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यासोबत दिवाळी साजरी करायला दाखल झाले होते. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यात जाऊन पोलिसांच्या कुटुंबियांसह दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत आणि कुटुंबियासह दिवाळी साजरी केली आहे.

हे वाचलं का?

असं जरी असलं तरी, राज्यात अवेळी पडलेल्या पाऊसामुळं शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळं ऐनदिवाळीच्या तोंडावर लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची दिवाळी ही यंदा फारसी चांगली झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं शासनाच्या मदतीकडे लक्ष लागलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT