रणबीर कपूर आणि आलिया भट अखेरीस विवाहबंधनात
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा विवाहसोहळा आज संपन्न झाला आहे. परिवारातील सदस्य आणि काही मोजक्या मित्रपरिवाराच्या उपस्थित मुंबईत रणबीर कपूरच्या वांद्रे येथील घरात हा विवाहसोहळा पार पडला. आज संध्याकाळी सात वाजता रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच नवरा-बायको म्हणून मीडियासमोर येणार आहेत. रणबीर आणि आलियाच्या लग्नसोहळ्यासाठी वांद्रे येथील घराबाहेर मीडियाच्या प्रतिनिधींनी […]
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा विवाहसोहळा आज संपन्न झाला आहे. परिवारातील सदस्य आणि काही मोजक्या मित्रपरिवाराच्या उपस्थित मुंबईत रणबीर कपूरच्या वांद्रे येथील घरात हा विवाहसोहळा पार पडला.
ADVERTISEMENT
आज संध्याकाळी सात वाजता रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच नवरा-बायको म्हणून मीडियासमोर येणार आहेत. रणबीर आणि आलियाच्या लग्नसोहळ्यासाठी वांद्रे येथील घराबाहेर मीडियाच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. लग्नसोहळ्याला कपूर आणि भट कुटुंबातील व्यक्ती आणि मित्र परिवाराने हजेरी लावली होती.
काही दिवसांतच रणबीर आणि आलियाचं रिसेप्शन होणार आहे. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड दिपीका पदुकोण, कतरिना कैफ या देखील या रिसेप्शनला हजेरी लावणार असल्याचं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून रणबीर-आलियाच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT