जेजुरीत रंगाची उधळण! असा रंगला रंगपंचमीचा सोहळा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

येळकोट येळकोट म्हटलं की साक्षात नजरेसमोर येतं महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेराया.

हे वाचलं का?

जेजुरीत एका छोट्या टेकडीवर असलेल्या खंडोबाच्या मंदिरात आज रंग पंचमी उत्साहात साजरी करण्यात आली.

ADVERTISEMENT

जेजुरी गडावरील खंडेराया मंदिरात रंगपंचमीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

ADVERTISEMENT

जेजुरी गडावर वर्षातील जत्रा-यात्रा ,सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

याच सण उत्सवांची परंपरा म्हणून जेजुरीच्या गडावर खंडेरायाची रंगपंचमी मोठ्या श्रद्धेनं दरवर्षी साजरी केली जाते. यंदाही हा सोहळा पार पडला.

पहाटे पूजा-अभिषेक व आरती झाल्यानंतर मुख्य भैरवनाथ मूर्तींसह स्वयंभू लिंगाला विविध रंग लावण्यात येऊन देवांची रंगपंचमी साजरी करण्यात आली.

देवांना रंग लावल्यानंतर शहरामध्ये सणाच्या उत्साहाला उधाण आलं.

जेजुरी गडावर असलेल्या खंडोबा मंदिरात जाण्यासाठी सुमारे दोनशे पायऱ्या चढून जावे लागते. त्यानंतर डोंगरावरून संपूर्ण जेजुरीचे दृश्य नजरेत साठवून ठेवावं असंच असतं.

प्राचीन दीपमाळांसाठी प्रसिद्ध असलेल्या जेजुरीत चंपाषष्ठीला मोठी यात्रा भरते. सहा दिवसांच्या या यात्रेचा समारोप ज्या दिवशी होतो त्याला चंपा षष्ठी म्हणतात.

लिंग, तांदळा, मुखवटे, मूर्ती आणि टाक ही श्री खंडोबारायाची पाच प्रतीके मानली जातात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT