मुंबईकरांनो ‘या’ ठिकाणांवर तुमची अचानक कोरोना टेस्ट होणार, खर्चही तुमच्याकडूनच !

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरात गर्दी होणाऱ्या ठिकाणी म्हणजेच मॉल, रेल्वे स्टेशन (बाहेरुन मुंबईत येणाऱ्या ट्रेन), MSRTC बस डेपो, खाऊ गल्ली, फेरीवाल्यांची ठिकाणं, बाजारपेठा, पर्यटनाची ठिकाणं आणि विविध सरकारी रुग्णालयात अचानक रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जाणार आहे. ही टेस्ट करुन घेण्यासाठी कोणत्याही नागरिकाने सहकार्य केलं नाही तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल.

ADVERTISEMENT

मुंबई मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ करणार, वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाचा निर्णय

मुंबई महापालिकेकडून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत, काय आहेत हे नियम जाणून घ्या…

हे वाचलं का?

१) शहरातील प्रत्येक मॉलमध्ये किमान ४०० रॅपिट अँटिजेन टेस्ट केल्या जातील.

२) बाहेरुन मुंबईत येणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांचीही अचानक रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाईल. यासाठी रोजचं लक्ष्य हे किमान १ हजार प्रवासी एवढं असेल.

ADVERTISEMENT

३) हाच निकष MSRTC च्या बस डेपोवरही लावला जाणार आहे.

ADVERTISEMENT

४) मुंबईतील प्रत्येक वॉर्डात गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर किमान १ हजार चाचण्या करण्याचं उद्दीष्ठ. याव्यतिरीक्त हॉटेल-रेस्टॉरंट, खाऊ गल्ली, फेरीवाल्यांची ठिकाणं, बाजारपेठा, पर्यटनाची ठिकाणं इथेही अचानक अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे.

५) मॉलमध्ये फिरायला किंवा खरेदी करण्यासाठी येणाऱ्या लोकांकडून रॅपिड अँटीजेन टेस्टचा खर्च वसूल करण्यात येईल. एखाद्या व्यक्तीने स्वतःची चाचणी करवून घ्यायला आणि पैसे देण्यास नकार दिला तर त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात येईल.

६) याव्यतिरीक्त इतर गर्दीच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या रॅपिड अँटीजेन टेस्टचा खर्च हा महापालिका करणार आहे.

मुंबईतील क्रिस्टल शॉपिंग मॉल, नक्षत्र मॉल, इन्फिनीटी मॉल, मोक्ष, मार्केट सिटी, प्लॅटिनम यासारख्या मॉलमध्ये महापालिकेकडून अचानक कोरोनाच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने हे पाऊल उचललं आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनन्स, अंधेरी, बोरिवली, लोकमान्य टिळक टर्मिनन्स या रेल्वे स्टेशनवर अँटीजेन टेस्ट होणार आहेत. याचसोत MSRTC च्या मुंबई सेंट्रल, परळ, बोरिवली आणि कुर्ला या डेपोंमध्येही प्रवाशांची अचानक कोरोना चाचणी घेतली जाणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT