आंबेगाव तालुक्यात आढळली दुर्मिळ ‘लेपर्ड गेको’ जातीची पाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील सर्प व किटक अभ्यासक गायत्री राजगुरव व शारदा राजगुरव यांना शिंगवे परिसरातील जैवविविधतेचा आभ्यास करत असताना माळरानावर “लेपर्ड गेको” ह्या दुर्मिळ पालीचे प्रथमच अस्तित्व आढळून आले आहे.

ADVERTISEMENT

लेपर्ड गेको ही खडकाळ माळरानावर आढळणारी पालीची निशाचर प्रजाती असून ही फक्त रात्रीच्या वेळीच ढगाळ वातावरण व पहिल्या पावसात माळरानावर खडकांवरील दगडांवर आढळते. ह्या पालीचे शास्रीय नाव युब्लिफँरिस मँक्युलारिस असं आहे. अंगावर असणाऱ्या बिबट्या सारख्या नक्षी मुळे या पालीला ‘लेपर्ड गेको’ असे नाव पडवले आहे. शेतीला ऊपद्रवी लहान किटक, नाकतोडे, पतंग हे ह्या पालीचे भक्ष्य असून या ऊपद्रवी किटकांच्या नियंत्रणाचे काम ह्या पालीकडुन होते असे गायत्री यांनी सांगितले.

लेपर्ड गेको मध्ये मादी नरापेक्षा आकाराने लहान असून नराची लांबी २० ते २८ से. मी.असते. मादी ही १८ ते २० सें.मी.लांबीची असते. या पालीच्या पिल्लांच्या अंगावर गडद पिवळे व काळे आडवे पट्टे दिसतात व पालीच्या वाढी बरोबर अंगावरील पट्टे फिकट होऊन बिबट्या सारखे ठिपक्यांची नक्षी पालीच्या अंगावर दिसून येते.आंबेगाव तालुक्यात प्रथमच या पालीचे अस्तित्व अढळून आल्याने या पालीची माहिती आंबेगाव तालुक्यातील वन अधिकारी RFO राजहंस यांना देऊन आंबेगाव तालुक्यातील जैव विवीधता यादीत या पालीचा समावेश करावा हि विनंती गायत्री राजगुरव यांनी केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT