सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर रश्मी देसाई का आहे चर्चेत?
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनानंतर अभिनेत्री रश्मी देसाई ही खूपच चर्चेत आली आहे. कारण काही वर्षांपूर्वी हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई ही जोडी दिल से दिल तक मालिकेत एकत्र दिसली होती. तेव्हापासून त्यांच्या अफेअरची बरीच चर्चा होती. दरम्यान, सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर रश्मी देसाईबाबत देखील सोशल मीडियावर बऱ्याच […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनानंतर अभिनेत्री रश्मी देसाई ही खूपच चर्चेत आली आहे. कारण काही वर्षांपूर्वी हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती.
सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई ही जोडी दिल से दिल तक मालिकेत एकत्र दिसली होती. तेव्हापासून त्यांच्या अफेअरची बरीच चर्चा होती.
हे वाचलं का?
दरम्यान, सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर रश्मी देसाईबाबत देखील सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी सर्च होत आहेत.
सिद्धार्थ आणि रश्मी देसाई हे अनेक दिवस एकमेकांना डेट करत होते. मात्र, नंतर त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
ADVERTISEMENT
बिग बॉस 13 या रियालिटी शोमध्येही दोघं एकत्र होते. पण इथे अजिबातच त्यांचं बाँडिंग नव्हतं. त्याऐवजी दोघांमध्ये भांडणंच अधिक पाहायला मिळाली होती.
ADVERTISEMENT
दुसरीकडे रश्मी देसाई ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर याबाबत आपलं मतही व्यक्त केलं होतं. पण तिने कुठे थेटपणे सिद्धार्थवर काहीही आरोप केले नव्हते.
बिग बॉसमध्ये रश्मीने सिद्धार्थला जोरदार टक्कर दिली होती. पण शेवटी सिद्धार्थ बिग बॉसचा 13 व्या सिझनचा विजेता ठरला होता.
या सगळ्या गोष्टींमुळेच रश्मी देसाई ही इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केली जात आहे.
रश्मी देसाई ही सध्याच्या घडीला छोट्या पडद्यावरील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT