उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयावर बारामतीत गोळीबार
बारामती: बारामती (Baramati) येथे अज्ञात हल्लेखोरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जिल्हा परिषद सदस्याच्या पतीवर गोळ्या झाडल्याची (Firing) धक्कादायक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे रविराज तावरे यांच्यावर दोन गोळ्या हल्लेखोरांनी झाडल्या. त्यापैकी रविराज यांना एक गोळी लागली. ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, त्यांना तात्काळ बारामतीच्या खासगी […]
ADVERTISEMENT
बारामती: बारामती (Baramati) येथे अज्ञात हल्लेखोरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जिल्हा परिषद सदस्याच्या पतीवर गोळ्या झाडल्याची (Firing) धक्कादायक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे रविराज तावरे यांच्यावर दोन गोळ्या हल्लेखोरांनी झाडल्या. त्यापैकी रविराज यांना एक गोळी लागली. ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, त्यांना तात्काळ बारामतीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ही घटना सायंकाळी साडेसहा वाजता बारामती तालुक्यातील मालेगाव येथे घडली असल्याचं समजतं आहे. मालेगावच्या संभाजी नगर भागात रविराज आपली पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्यासह बाहेर आलेले असताना अचानक साखर कारखान्याच्या दिशेने जाणाऱ्या बुलेट गाडीवरील दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये रविराज गंभीर जखमी झाले. दरम्यान रात्री उशीरा पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून तावरेंवर झालेला हल्ला हा राजकीय वादातून की वैय्यक्तिक कारणावरुन झालाय याचा शोध पोलीस घेत आहेत.
…. तर लोकांना किंमत मोजावी लागेल-अजित पवार
हे वाचलं का?
जखमी झाल्यानंतर देखील रविराज आपल्या कारमध्ये बसून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते. पण गोळी त्यांच्या खांद्याला लागली होती त्यामुळे त्यांना कार चालवता येत नव्हती. दरम्यान, गोळ्यांचा आवाज ऐकताच जवळपास असणाऱ्या अनेकांनी रविराज यांच्या दिशेने धाव घेतली आणि दुसऱ्या एका खासगी वाहनात त्यांना उपचारांसाठी बारामतीला नेण्यात आलं. बारामतीच्या खासगी रुग्णालयात तावरे यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली, ज्यानंतर त्यांची प्रकृती आता स्थिर मानली जात आहे.
ADVERTISEMENT
त्यांना बारामती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रविराज हे राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते मानले जातात. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांच्या माध्यमातून त्यांनी आजूबाजूच्या भागात बरीच विकास कामे सुरू केली आहेत. रविराज स्वत: हे अनेक ठिकाणी कंत्राटदार म्हणून काम पाहतात.
ADVERTISEMENT
गावातील राजकीय वैरातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पुण्याचे एसपी डॉ. अभिनव देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बारामतीचे डीव्हायएसपी नारायण शिरगावकर यांनी हल्लेखोरांच्या शोधात अनेक ठिकाणी पोलीस पाठवले आहेत.
…तुम्हाला बोललो की मग राग येतो ! जेव्हा अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फटकारतात
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मतदारसंघात अशा प्रकारची घटना घडल्याने येथे सध्या बरंच तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. दुसरीकडे हा हल्ला नेमका का झाला असावा याचा देखील पोलीस सखोल तपास करत आहेत. मात्र जोवर हल्लेखोर पकडले जात नाहीत तोवर या हल्ल्यामागचा नेमका हेतू समोर येणार नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT