Tokyo Olympics : ती ५ मिनीटं, वाचा Neeraj Chopra सोबतच्या भेटीनंतर ‘मुंबई तक’च्या प्रतिनिधीला आलेला अनुभव
प्रशांत भट, प्रतिनिधी (टोकियो) टोकियो ऑलिम्पिकच्या शेवटच्या दिवशी भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णअध्याय लिहत इतिहास घडवला. अंतिम फेरीत सर्वोत्तम कामगिरी करत नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं. या ऐतिहासीक कामगिरीनंतर सर्व स्तरातून नीरजवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. यंदा कोरोनामुळे ऑलिम्पिकचं वृत्तांकन प्रसारमाध्यमांचे फार कमी प्रतिनिधी टोकियोत गेले आहेत. गोल्ड मेडल जिंकल्यानंतर […]
ADVERTISEMENT
प्रशांत भट, प्रतिनिधी (टोकियो)
ADVERTISEMENT
टोकियो ऑलिम्पिकच्या शेवटच्या दिवशी भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णअध्याय लिहत इतिहास घडवला. अंतिम फेरीत सर्वोत्तम कामगिरी करत नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं. या ऐतिहासीक कामगिरीनंतर सर्व स्तरातून नीरजवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. यंदा कोरोनामुळे ऑलिम्पिकचं वृत्तांकन प्रसारमाध्यमांचे फार कमी प्रतिनिधी टोकियोत गेले आहेत. गोल्ड मेडल जिंकल्यानंतर नीरजसोबत सेल्फी काढण्यांसाठी सर्वजण उत्सुक होते.
‘मुंबई तक’चे प्रतिनिधी प्रशांत भट ही टोकियोत आहेत. इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्रासोबत बोलून त्याच्यासोबत फोटो काढण्याची संधी प्रशांत भट यांना मिळाली. जाणून घेऊयात कसा होता, त्यांना आलेला अनुभव….
हे वाचलं का?
Tokyo Olympics 2020 : Neeraj Chopra च्या भाल्याने घेतला सुवर्णपदकाचा वेध, भारताच्या खात्यात पहिलं Gold Medal
खरंतर त्याची ही ऐतिहासीक कामगिरी आमच्या डोळ्यांसमोर घडली यात आमचं भाग्य आहे. सामना संपल्यानंतर मीडिया सेंटरमध्ये नीरज आला. यंदा मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषदाही पटापट होत आहेत. त्यावेळी साहजिकच सर्वजण त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उत्सुक होते. हा प्रसंग हातचा जाऊ द्यायचा नाही हे मी ठरवलं होतं. नीरज जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा तो देखील खूप उत्साहात होता. काय बोलावं हेच त्याला कळत नव्हतं.
ADVERTISEMENT
Tokyo Olympics मध्ये सुवर्णाध्याय लिहिणाऱ्या Neeraj Chopra चं महाराष्ट्र कनेक्शन माहिती आहे का?
ADVERTISEMENT
त्याच्या हातात एक पेन होतं, मी सेल्फी काढल्यानंतर त्याच्याकडे ऑटोग्राफची मागणी केली. परंतू नेमका त्यावेळी माझ्याकडे ऑटोग्राफ घेण्यासाठी कागद किंवा दुसरी काहीच गोष्ट नव्हती. माझ्या आयडी कार्डवर सही घ्यावी असा विचार आला…पण ती लगेच पुसली गेली असती. म्हणून शेवटी मी नीरजला म्हणालो, माझ्या टी-शर्टच्या पाठीमागे सही कर. त्यावेळी तो म्हणाला, भाई तुमारे पिछे सब काला है वहा कुछ नही दिखेगा…तो प्रसंग इतका अवर्णनीय होता की मला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. शेवटी नीरजनेच पुढाकार घेऊन आमच्या टी-शर्टच्या पुढच्या बाजूला सही केली. मी खास विनंती करत आजची तारीख त्याला टाकायला सांगितलं. यानंतर नीरज डोप टेस्टसाठी निघून गेला. पण सुवर्णपदक जिंकणाऱ्या त्या खेळाडूसोबतची ती ५ मिनीटं आणि तो क्षण आयुष्यभर माझ्या लक्षात राहील याच काही शंकाच नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT