विरार : रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना धक्काबुक्कीचा प्रयत्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विरार पूर्व भागातील बालाजी हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला धक्काबुक्की करत शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याविरोधीत डॉ. श्रीराम अय्यर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेला अशक्तपणा वाटत असल्यामुळे बालाजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यावेळी उपचाराआधी महिलेची आरटीपीसीआर टेस्ट करत असताना नाकातून स्वॅब कलेक्ट करत असताना स्टिकचं टोक नाकातच तुटल्याचा आरोप नातेवाईकांनी करत गोंधळ घालायला सुरुवात केली.

हे वाचलं का?

रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. ज्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल केली…ज्यावरुन विरार पोलिसांनी नातेवाईंकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT