पुण्यात निर्बंध ‘जैसे थे’, १५ जुलैपर्यंत कॉलेज-शाळा बंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरीही ग्रामीण भागात वाढत जाणारे रुग्ण प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. या पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. दरवेळी अजित पवार ही बैठक घेत असतात परंतू यंदा ते उपस्थित राहू न शकल्यामुळे दिलीप वळसे पाटलांनी ही बैठक घेतली. या बैठकीत १५ जुलैपर्यंत सध्याचे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

ADVERTISEMENT

“सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहतील. शाळा आणि कॉलेज संदर्भात १५ जुलै पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. निर्बंध शिथिल करण्याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील. लसीकरणाला गती मिळालीय, त्यासाठी प्रशासन प्रयत्न करतेय. तिसरी लाट येण्याची चिंतेची बाब आहे. तिसऱ्या लाटेचा धोका आहेच त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागणं गरजेचं आहे.. बाहेर पडणं, पर्यटनाला जाणं असे प्रकार टाळावेत”, असं आवाहन गृहमंत्री वळसे पाटील यांनी केले.

यावेळी बोलत असताना लग्नामध्ये वाढत जाणारी गर्दी हा चिंतेचा विषय असून पोलिसांना याबद्दल आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही वळसे पाटील यांनी सांगितलं. दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने केलेल्या छापेमारीबद्दल विचारलं असता वळसे पाटील यांनी मोघम प्रतिक्रिया दिली. “मी याबाबत जास्त बोलू इच्छित नाही. संबंधित यंत्रणा तपास करत आहे. चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जाताय. सर्वांचे लक्ष कोरोनाकडे असायला हवं. कुणी काहीही मागणी केली तर चौकशी होत नाही. CBI चौकशीसाठी राज्याची परवानगी घ्यावी लागेल,”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT