मुळा नदीकिनारी झाडावर सापडलेल्या ‘त्या’ मृतदेहाबद्दल पोलीस आयुक्तांचा खुलासा

मुंबई तक

– समीर शेख, प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरालगत असलेल्या हिंजवडी IT पार्क परिसरातून वाहणार्‍या मुळा नदीच्या काठी असलेल्या एका उंबराच्या झाडावरील फांदीला महिलेचं प्रेत टांगलेल्या अवस्थेत आढळून आलं होतं. आता या प्रकरणी पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश यांनी मोठा खुलासा केला आहे. या घटनेबाबतची माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना याच परिसरातील एका किराणा दुकानाचे व्यापारी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

– समीर शेख, प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरालगत असलेल्या हिंजवडी IT पार्क परिसरातून वाहणार्‍या मुळा नदीच्या काठी असलेल्या एका उंबराच्या झाडावरील फांदीला महिलेचं प्रेत टांगलेल्या अवस्थेत आढळून आलं होतं. आता या प्रकरणी पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश यांनी मोठा खुलासा केला आहे.

या घटनेबाबतची माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना याच परिसरातील एका किराणा दुकानाचे व्यापारी असलेले रमेश गेहलोत नामक व्यापाऱ्याने दिली होती. या माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश गुन्हे शाखेचे प्रशांत अमृतकर व तसेच शास्त्र विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली.

त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात असलेल्या गावामधील लोकांकडून ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला की कोणी महिला येथून हरवली आहे का. त्यावर होडगे नामक कुटुंबीयांनी हा दावा केला की त्यांच्या परिवारातील 56 वर्षीय सुधा नामक महिला मागील आठ महिन्यांपासून बेपत्ता होती.

हे वाचलं का?