Surya Grahan 2021 : सूर्य ग्रहण भारतात कुठे आणि कधी दिसणार वाचा सविस्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Surya Grahan 2021 today in India : या वर्षीचं पहिलं सूर्यग्रहण (Solar EClipse 2021) 10 जून म्हणजे आज आहे. पंधरा दिवसांच्या आत लागणारं हे दुसरं ग्रहण आहे. ज्योतिष शास्त्रात इतक्या कमी कालावधीत लागणारं ग्रहण अशुभ मानलं जातं. या वर्षी एकूण चार ग्रहणं असणार आहेत. त्यातली दोन सूर्यग्रहणं आहेत तर दोन चंद्रग्रहणं. पहिलं चंद्रग्रहण 26 मे रोजी होऊन गेलं तर दुसरं चंद्रग्रहण 19 नोव्हेंबरला असणार आहे. तर 10 जूनला असणाऱ्या म्हणजेच आज असणाऱ्या सूर्यग्रहणानंतर दुसरं सूर्यग्रहण 4 डिसेंबरला असणार आहे.

ADVERTISEMENT

आज वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आहे. कृष्ण पक्षातील अमावस्या आजच आहे तसंच आज शनि जयंतीही आहे. आज लागणारं सूर्यग्रहण दुपारी 1 वाजून 42 मिनिटं ते संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटं या कालावधीत असणार आहे. संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे. सूर्यग्रहण वृषभ रास आणि मृग नक्षत्रात असणार आहे.

हे वाचलं का?

आज होणारं हे सूर्यग्रहण अमेरिका, युरोप, आशिया खंड यामध्ये अंशिक स्वरूपात पाहण्यास मिळेल. तर ग्रीनलँड, उत्तर कॅनडा आणि रशिया या देशांमध्ये पूर्ण सूर्य ग्रहण पाहता येईल. नासा ने दिलेल्या माहितीनुसार भारतात होणारं हे सूर्य ग्रहण लडाख आणि अरूणाचल प्रदेशमध्येच दिसणार आहे.

ADVERTISEMENT

शनि जयंतीच्या दिवशी हे सूर्यग्रहण होतं आहे. भारतात हे सूर्यग्रहण फक्त अरूणाचल आणि लडाखमधे दिसणार आहे. सूर्य ग्रहण लागण्याच्या 12 तास आधी त्याचे वेध लागण्यास सुरूवात होते. ग्रहणाच्या आधी आणि ग्रहण काळात अनेक प्रकारचे नियम पाळले जातात. ग्रहण संपेपर्यंत देवाच्या मूर्तीला हात लावू नये. ग्रहणाच्या वेळी देवघराचा दरवाजा बंद करून घ्यावा. ग्रहणकाळात गरोदर महिलांनी ग्रहण पाहू नये, तसंच घराबाहेर पडू नये. ग्रहण काळात स्त्री-पुरूषांनी शारिरीक संबंध ठेवू नये. या काळात केस आणि नखं कापू नये असे काही नियम आहेत जे पाळण्यावर लोक भर देतात.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT