नांदेड : पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे १५ लाख लुटले, पोलीस तपास सुरु
नांदेड शहरात पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्याजवळील १५ लाखाची रक्कम दिवसाढवळ्या लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ओम बोरलेपवार असं या व्यापाऱ्याचं नाव असून त्यांची नांदेडमध्ये हिंदुस्थान लिवरची एजन्सी आहे. आपल्या एजन्सीच्या बँक खात्यात १५ लाखांची रक्कम भरायला जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दिवसाढवळ्या पिस्तुलाच्या धाकावर व्यापाऱ्याला अशा पद्धतीने लुटण्यात आल्यामुळे शहरात भीतीचं वातावरण […]
ADVERTISEMENT
नांदेड शहरात पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्याजवळील १५ लाखाची रक्कम दिवसाढवळ्या लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ओम बोरलेपवार असं या व्यापाऱ्याचं नाव असून त्यांची नांदेडमध्ये हिंदुस्थान लिवरची एजन्सी आहे. आपल्या एजन्सीच्या बँक खात्यात १५ लाखांची रक्कम भरायला जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दिवसाढवळ्या पिस्तुलाच्या धाकावर व्यापाऱ्याला अशा पद्धतीने लुटण्यात आल्यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ADVERTISEMENT
ओम बोरलेपवार आपल्या टू-व्हिलरवरुन बँकेत पैसे भरायला जात होते. दुपारी १२ वाजल्याच्या दरम्यान हिंगोली गेट परिसरात तीन लुटारुंनी ओम बोरलेपवार यांचा रस्ता रोखला. यानंतर आपल्या जवळील पिस्तुलाचा धाक दाखवून चोरट्यांनी बोरलेपवार यांच्याजवळची १५ लाखांची रक्कम पळवून घटनास्थळावरुन पोबारा केला. ही घटना अवघ्या काही मिनीटांत घडल्यामुळे बोरलेपवार फारशी हालचाल करु शकले नाहीत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तिन्ही चोरट्यांविरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथकं पाठवली आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT