Independence Day Celebration : शहीद सैनिकांच्या परिवाराला चांदीच्या ताटात शाही भोजन, बच्चू कडूंचा अनोखा उपक्रम
भारतात आज ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्यात आला. ७५ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या भारताच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात लष्कराची भूमिका मोठी असते. दरवर्जी अनेक तरुण लष्करी सेवेत भरती होतात. अनेक तरुणांना सीमेवर लढत असताना हौतात्म्य पत्करावं लागलं. आजच्या दिवशी अतिरेक्यांशी लढताना […]
ADVERTISEMENT
भारतात आज ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्यात आला. ७५ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या भारताच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात लष्कराची भूमिका मोठी असते. दरवर्जी अनेक तरुण लष्करी सेवेत भरती होतात. अनेक तरुणांना सीमेवर लढत असताना हौतात्म्य पत्करावं लागलं.
ADVERTISEMENT
आजच्या दिवशी अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सैनिकांच्या परिवाराचा अकोल्यात खास सत्कार करण्यात आला. पालकमंत्री बच्चू कडू यांनी या परिवारांसाठी खास शाही भोजनाचं आयोजन केलं होतं.
अकोला जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या कुटूंबासोबत आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाहीभोजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. देश रक्षणाकरीता प्राणाची आहुती देणार्यां कुटूंबाच्या सन्मानाकरीता एक छोटासा उपक्रम… pic.twitter.com/EoUBCEwI7w
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) August 15, 2021
स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी दिनानिमीत्त बच्चू कडू यांनी खास चांदीच्या ताटात शहीद सैनिकांच्या परिवारासाठी जेवणाचा बेत आयोजित केला होता. पालकमंत्र्यांनी केलेल्या या आदरातिथ्यामुळे उपस्थित लोकांनाही गहीवरुन आलं. बच्चू कडूंनी सर्वप्रथम शहीदांच्या परिवारातील सदस्यांचे पाय धुवून त्यांचं स्वागत केलं. यानंतर त्यांना चांदीच्या ताटात जेवायला बसवून बच्चू कडूंनी स्वतः पंगतीत त्यांना काय हवंय काय नको याची विचारपूस केली.
हे वाचलं का?
“या परिवारांनी आपल्या पोटचा गोळा देशासाठी दिला आणि त्यांनी रक्त सांडल्यामुळे आपल्याला आजचा हा दिवस दिसत आहे. त्यांनी केलेल्या कामापुढे आम्ही केलेला आदर-सत्कार काहीच नाही”, असं बोलत असताना बच्चू कडूंचे डोळे पाणावले होते. आतापर्यंत आम्हाला कधीही अशा प्रकारचा सन्मान मिळाला नव्हता असं म्हणत शहीदांच्या घरातील परिवारांनी समाधान व्यक्त केलं.
ADVERTISEMENT
Tricolour: Pandharpur विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तिरंगी फुलांची सजावट
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT