सरसंघचालक मोहन भागवतांनी घेतली कोरोनाची लस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाहन भैय्याजी जोशी यांनी शनिवारी कोरोना लसीचा आपला पहिला डोस घेतला. नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्यूटमध्ये जाऊन भागवत आणि जोशी यांनी लस घेतली. १ मार्चपासून देशभरासह राज्यात कोरोनाच्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा, एस. जयशंकर आणि अन्य महत्वाच्या नेत्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी १० हजारांपेक्षा जास्त नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारीच ही संख्या ठरली आहे. मागील २४ तासांमध्ये १० हजार १८७ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासांमध्ये ६ हजार ८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २० लाख ६२ हजार३१ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ४७ मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

कोरोना रूग्ण वाढू लागल्याने औरंगाबादमध्ये १० दिवसांचा Lockdown

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६७ लाख ७६ हजार ५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख ८ हजार ५८६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख २८ हजार ६७६ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ४ हजार ५१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला ९२ हजार ८९७ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आज राज्यात १० हजारांपेक्षा जास्त रूग्णांची नोंद झाल्याने आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या २२ लाख ८ हजार ५८६ इतकी झाली आहे.

ADVERTISEMENT

COVID टेस्टसाठी अकोल्यात गर्दी, कुठे आहे Social Distancing?

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT