Mob Lynching करणारे हिंदुत्त्व विरोधी, सगळ्या भारतीयांचा DNA एकच -मोहन भागवत
Mob Lynching अर्थात जमाव हत्या करणारे, मारहाण करणारे हिंदुत्व विरोधी आहेत असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. एवढंच नाही तर सगळ्या भारतीयांचा DNA एकच आहे असंह त्यांनी म्हटलं आहे. गाझियाबाद या ठिकाणी मुस्लिम राष्ट्रीय मंचाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे. नेमकं काय म्हणाले आहेत मोहन भागवत? ‘सगळ्या […]
ADVERTISEMENT
Mob Lynching अर्थात जमाव हत्या करणारे, मारहाण करणारे हिंदुत्व विरोधी आहेत असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. एवढंच नाही तर सगळ्या भारतीयांचा DNA एकच आहे असंह त्यांनी म्हटलं आहे. गाझियाबाद या ठिकाणी मुस्लिम राष्ट्रीय मंचाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाले आहेत मोहन भागवत?
‘सगळ्या भारतीयांचा DNA एकच आहे, तो कोणत्याही धर्माचा असो. तसेच देशातील हिंदू-मुस्लिम एकता एक भ्रामक चर्चा आहे. कारण आम्ही वेगळे नाही, एकच आहोत. पूजा करण्याच्या पद्धतीनेवरून लोकांमध्ये भेदाभेद करणं चुकीचं आहे. तसंच जमावातून एखाद्याची हत्या करणारे लोक हिंदुत्व विरोधी आहेत.’ असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. ‘जर कुणी व्यक्ती हे सांगत असेल की मुस्लिम इथे राहू शकत नाही तर तो व्यक्ती हिंदू नाही. गाय एक पवित्र प्राणी आहे. मात्र जे लोक गायीच्या नावाने दुसऱ्यांना मारत आहेत ते हिंदुत्वाच्या विरोधात जात आहेत. या लोकांवर कायद्याने पक्षपात न करता कारवाई केली पाहिजे.’ असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
‘जर कुणी व्यक्ती हे सांगत असेल की मुस्लिम इथे राहू शकत नाही तर तो व्यक्ती हिंदू नाही. गाय एक पवित्र प्राणी आहे. मात्र जे लोक गायीच्या नावाने दुसऱ्यांना मारत आहेत ते हिंदुत्वाच्या विरोधात जात आहेत. या लोकांवर कायद्याने पक्षपात न करता कारवाई केली पाहिजे.’
मोहन भागवत, सरसंघचालक
‘आपण मागच्या 40 हजार वर्षांपासून पूर्वजांचे वंशज आहोत. भारतातील सगळ्यांचा डीएनए एकच आहे. हिंदू-मुस्लिम हे दोन समूह नाहीत. एकत्र येण्यासारखं काहीच नाही कारण आम्ही पहिल्यापासून एकच आहोत. आपण लोकशाही असलेल्या देशात वास्तव्य करतो. त्यामुळे इथे हिंदू आणि मुस्लिम प्रभुत्व निर्माण होऊ शकत नाही. फक्त भारतीयांचं प्रभुत्व निर्माण होतं. देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही. राष्ट्रवाद हा एकतेचा आधार असला पाहिजे’ असंही मोहन भागवत यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे गाझियाबाद या ठिकाणी मुस्लिम मंचने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित होते. डॉ. ख्वाजा इफ्तिकार अहमद यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं लोकार्पण मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं. डॉ. ख्वाजा अहमद यांनी वैचारिक समन्वय एक पहल या नावाचं पुस्तक लिहिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT