अकोल्यात लसीकरण केंद्रावर मोठा गोंधळ, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात आज राज्य सरकारला लसीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ वयोगटासाठीचं लसीकरण थांबवावं लागलं आहे. प्रत्येक व्यक्तीने लस घ्यावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असताना अनेक शहरांत लसीकरण केंद्रावरच सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचा फज्जा उडत असताना पहायला मिळतोय. अकोल्यात जिल्हा महिला रुग्णालयात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची आज गर्दी पहायला मिळाली.

जिल्हा महिला रुग्णालयात लसीचा साठा कमी आणि लस घ्यायला आलेल्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे नागरिकांनी गोंधळ केला. लसीकरणासाठी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाल्यामुळे ओपीडीमधील रुग्णांना त्रास व्हायला लागला. यानंतर जिल्हा रुग्णालयाने लसीकरण केंद्र दोन किलोमीटर लांब असलेल्या अशोक नगर परिसरात हलवलं. हे समजताच नागरिकांनी आणखीनच गोंधळ घालायला सुरुवात केली.

पिंपरी-चिंचवड : रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे तीन जणं अटकेत

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जिल्हा रुग्णालयात आज १५०-२०० डोस आले होते…परंतू लस घेण्यासाठी सकाळी ५ वाजल्यापासून लोकांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. सकाळपासून आलेल्या लोकांना कूपनचं वाटपही झालं. परंतू यानंतरही लसीकरण सुरु होत नसल्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यादरम्यान जिल्हा रुग्णालयात गर्दी झाल्यामुळे स्थानिक प्रशासनाने हे लसीकरण अशोक नगर भागातील पालिकेच्या आयुर्वैदीक दवाखान्यात हलवलं.

नागपूरमध्ये सर्व लसीकरण केंद्रांवरचा लसींचा साठा संपला, लसीकरण बंद

ADVERTISEMENT

परंतू संतप्त नागरिकांनी लस घेऊन जाणारी अँब्यूलन्स रोखून धरल्यामुळे या भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेरीस पोलिसांच्या संरक्षणात ही अँब्यूलन्स दुसऱ्या लसीकरण केंद्राच्या दिशेने रवाना झाली. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार नागरिकांना वारंवार सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत आहे. परंतू लसीच्या तुटवड्यामुळे जर जिल्हा रुग्णालयातच अशा प्रकारे व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजणार असतील तर कोरोनावर नियंत्रण मिळवणार तरी कसं असा प्रश्न आता स्थानिक नागरिक विचारत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT