जागोजागी पडलेले मृतदेह अन् मृत्यूला चकवणारी माणसं; युक्रेनमधील मन थिजवून टाकणारी दृश्ये

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष इतक्या विकोपाला जाईल की, घरदार सोडून जीव वाचवण्यासाठी देश सोडायची वेळ येईल, असं युक्रेनमधील लोकांनाही वाटलं नव्हतं; पण रशियाच्या अचानक झालेल्या आक्रमणाने युक्रेनचं चित्र बदलून गेलं आहे.

हे वाचलं का?

कधीकाळी रशियाचाच भाग असलेला युक्रेन आज रशियाच्याच हल्ल्यांमुळे कोलमडून गेला आहे. रशियाच्या विशेष लष्करी मोहिमेमुळे युक्रेन युद्धाच्या खाईत ढकलला गेला आहे.

ADVERTISEMENT

24 फ्रेब्रुवारीला रशियन फौजांनी युक्रेनवर हवाई हल्ला चढवला. त्यानंतर सलग पाच दिवसांपासून युक्रेनवरील रशियाचे हल्ले सुरूच असून, युक्रेन आणि रशियन लष्कराच्या चकमकी झडत आहेत. या धुमश्चक्रीत दोन्ही बाजूंचे सैनिक मृत्यूमुखी पडत असून, अनेक ठिकाणी रस्त्यावर मृतदेह पडले आहेत.

ADVERTISEMENT

रशियाच्या लष्कराकडून मिसाईल डागण्यात आल्या. यातील काही मिसाईल युक्रेनमधील नागरी वस्त्यांमध्येच कोसळल्या. त्यामुळे अनेक घरांचं आणि मालमत्तांचं नुकसान झालं आहे.

विशेष लष्करी मोहीम असून, नागरिकांवर हल्ले केले जाणार नाही, असं रशियाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, रशियन सैनिकांकडून लष्कराशी संबंधित नसलेल्या ठिकाणांवरही हल्ले करण्यात आल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे.

युक्रेनची राजधानी कीव्हचा ताबा मिळवण्यासाठी रशियाचं सैन्य झटत असून, रशियन सैन्याला रोखण्यासाठी आणि परतवून लावण्यासाठी युक्रेनही झूंज देताना दिसत आहे. रशियाकडून झालेल्या आक्रमणानंतर युक्रेनमधील सर्वसामान्य माणसंंही शस्त्र हाती घेत आहेत.

आकाशातून होणारे बॉम्ब हल्ले. मध्येच डागण्यात येणाऱ्या मिसाईल. यामुळे युक्रेनमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण आहे. रशियाकडून हल्ले वाढल्यानंतर युक्रेननं नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेतला आहे.

युक्रेन सरकारच्या दाव्याप्रमाणे 5 लाखांहून अधिक नागरिक देश सोडून गेले आहेत. तर संयुक्त राष्ट्र संघाने दिलेल्या माहिती प्रमाणे 4 लाख 22 हजार लोकांनी युक्रेनमधून शेजारील देशांमध्ये स्थलांतर केलं आहे.

युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी लढाऊ विमानांचे सांगाडे पडले आहेत. तर काही ठिकाणी लष्करी वाहनं आगीत जळून खाक झाली आहेत.

हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी अनेक नागरिकांनी जमिनीखाली असलेल्या बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. तर काही लोक जमिनीखाली असलेल्या काही रेल्वे स्थानकावरच राहत आहेत.

रशियाकडून होत असलेल्या हल्ल्याविरोधात रोषही व्यक्त होत आहे. अनेक देशांकडून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भूमिकेला विरोध केला जात आहे. युद्ध थांबवण्यासाठी जगभरात ठिकठिकाणी नागरिक निदर्शनं करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT