युक्रेनमध्ये उडणार युद्धाचा भडका?; प्रचंड मोठ्या रशियन सैन्य ताफ्याची कीव्हच्या दिशेनं कूच

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सलग पाच दिवसानंतरही युक्रेनची राजधानी कीव्ह ताब्यात न आल्यानं आता रशियाने मोठा फौजफाटा युद्धभूमीत उतरवला आहे. राजधानी कीव्हच्या दिशेनं प्रचंड मोठा फौजफाटा कूच करताना दिसून आला आहे. दरम्यान, ही माहिती समोर आल्यानंतर भारताने कीव्ह मध्ये अडकलेल्या आपल्या ऩागरिकांना तत्काळ शहर सोडण्याचं आवाहन केलं आहे.

ADVERTISEMENT

रशिया-युक्रेन संघर्षाचा आज सहाव्या दिवशी मोठी घडामोड होताना दिसत आहे. युक्रेनची राजधानी कीव्हच्या दिशेनं रशियन सैन्याची प्रचंड मोठी तुकडी जात असल्याचं सॅटेलाईटमधून घेण्यात आलेल्या छायाचित्रात दिसून आलं आहे. रणगाड्यांचा समावेश असलेली ही तुकडी कीव्हपासून 27 किमी अंतरावर असल्याचं सांगण्यात येत आहे.

भारतीय विद्यार्थी अडकले; शिवसेना खासदार चतुर्वेदी पोलंडच्या राजदूतांवर भडकल्या

हे वाचलं का?

रशियन लष्कराची ही तुकडी तब्बल 64 किमी लांबीची असल्याचं सांगण्यात येत आहे. एंटोनोव्ह विमानतळाजवळ ही तुकडी आढळून आली. रशियन तुकडीचे सॅटेलाईट फोटो प्रसिद्ध करणाऱ्या मॅक्सर टेक्नॉलॉजी कंपनी म्हटलं आहे की, रशिय सैन्याचा हा ताफा 64 किमी इतक्या लांबीचा आहे. त्यात असंख्य लष्करी वाहनं, रणगाडेही आहे.

‘ब्रेडचा एकच तुकडा राहिलाय, कुणीतरी आम्हाला
बाहेर काढा’; भारतीय विद्यार्थ्यांची आर्त हाक

ADVERTISEMENT

त्याचबरोबर सॅटेलाईट छायाचित्रात कीव्हच्या पश्चिमेला आणि उत्तर पश्चिम दिशेला खराब झालेली लष्करी वाहनंही दिसत आहे. एक दुर्घटनाग्रस्त झालेला पुलही या छायाचित्रात दिसत आहे. मॅक्सरने नव्या फोटोतील हालचालीबद्दल म्हटलं आहे की, बेलारुसच्या दक्षिणेला सैनिक आणि लढाऊ हेलिकॉप्टरही दिसत आहे. हे ठिकाण युक्रेनच्या सीमेपासून फक्त 30 किमी इतकं दूर आहे.

ADVERTISEMENT

तत्काळ कीव्ह सोडा – भारतीय उच्चायुक्तालय

युद्धस्थिती उद्भवलेल्या युक्रेनच्या विविध शहारांमध्ये भारतीय विद्यार्थी आणि नागरिक अडकले आहेत. अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारताने ऑपरेशन गंगा हाती घेतलं असून, युक्रेनच्या शेजारील राष्ट्रांत दाखल झालेल्या भारतीयांना मायदेशात आणलं जात आहे.

केंद्रीय मंत्रीही युक्रेन शेजारच्या देशात गेले आहेत. विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना परत आणण्यासाठी मोहीम हाती घेतलेली असतानाच आज अचानक भारतीय दूतावासाने ट्विट करत तत्काळ कीव्ह सोडा आणि मिळेल त्या वाहनाने शहरातून बाहेर पडा, असं आवाहन केलं आहे. “कीव्हमधील भारतीयांना आवाहन. विद्यार्थ्यांसह सर्व भारतीयांना तत्काळ कीव्ह सोडावं. उपलब्ध असलेल्या रेल्वेनं अथवा इतर कोणत्याही वाहनाने”, असं भारताच्या युक्रेनमधील दूतावासाने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT