‘मिंधे’ मुख्यमंत्री, डुप्लिकेट ‘सेना’; दसरा मेळाव्या आधीच शिवसेनेनं एकनाथ शिंदेंवर डागले बाण

मुंबई तक

शिवसेनेविरोधातल्या बंडखोरीनंतर सामनाच्या अग्रलेखातून सातत्यानं ४० बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला जात असल्याचं दिसतंय. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून शिंदे गटाने उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, पण न्यायालयात ठाकरेंनी लढाई जिंकली. त्यानंतर एकनाथ शिंदेंना मिंधे मुख्यमंत्री म्हणत शिवसेनेनं टीकेचा बाण डागलाय. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क होणार आहे. मुंबई […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेनेविरोधातल्या बंडखोरीनंतर सामनाच्या अग्रलेखातून सातत्यानं ४० बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला जात असल्याचं दिसतंय. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून शिंदे गटाने उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, पण न्यायालयात ठाकरेंनी लढाई जिंकली. त्यानंतर एकनाथ शिंदेंना मिंधे मुख्यमंत्री म्हणत शिवसेनेनं टीकेचा बाण डागलाय.

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढत निर्णय दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला चांगलंच बळ आलं आणि न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून थेट शिंदेंवर हल्ला चढवला.

फडणवीसांचं नाव घेत भाजपला खडेबोल

“चार दिवसांपूर्वीच (उप) मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते, ‘मला संपविण्याचे खूप प्रयत्न शत्रूंनी केले, पण मी संपलो नाही.’ राजकारणात कुणी संपत नसतो. शिवसेनेचंही तसंच आहे. गेल्या 56 वर्षांत शिवसेनेला संपविण्यासाठी काय कमी प्रयत्न झाले? पण शिवसेना प्रत्येक वेळी नव्या जोमानं आणि तेजानं उसळून वर गेली. त्यामुळे गेल्या दोन-चार महिन्यांत फडणवीस व त्यांच्या पक्षाने शिवसेना संपविण्याचे जे प्रयत्न सुरू केले, 40 बेइमान लोकांच्या मदतीने जे कारस्थान रचले गेले, त्यामुळे शिवसेना संपेल या भ्रमात त्यांनी राहू नये”, असे खडेबोल शिवसेनेनं देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत भाजपला सुनावले आहेत.

‘…अन् तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली’; मराठा आरक्षण आंदोलकांबद्दल बोलताना तानाजी सावंतांचा तोल सुटला

हे वाचलं का?

    follow whatsapp