लसीकरणाच्या बाबतीत दिल्लीश्वरांची मोगलाई औरंगजेबाच्याही वरताण-शिवसेना
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. दररोज रूग्णांची संख्या 50 हजार किंवा त्याहून अधिक आहे. महाराष्ट्रात लसीकरण मोहीमही जोरात सुरू आहे. मात्र केंद्राकडून होणारा लसींचा पुरवठा थांबल्याने आता लसीकरण मोहिमेला स्थगिती देण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांवर आली आहे. मुंबईतही अनेक केंद्रांवर लसीकरण थांबवण्यात आलं आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेनेने सामनातून केंद्र सरकारवर टीकेचे […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. दररोज रूग्णांची संख्या 50 हजार किंवा त्याहून अधिक आहे. महाराष्ट्रात लसीकरण मोहीमही जोरात सुरू आहे. मात्र केंद्राकडून होणारा लसींचा पुरवठा थांबल्याने आता लसीकरण मोहिमेला स्थगिती देण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांवर आली आहे. मुंबईतही अनेक केंद्रांवर लसीकरण थांबवण्यात आलं आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेनेने सामनातून केंद्र सरकारवर टीकेचे ताशेरे झाडले आहेत. सामनाच्या अग्रलेखात केंद्र सरकारची तुलना औरंगजेबाशी करण्यात आली आहे. लसीकरणाच्या बाबतीत दिल्लीश्वरांची मोगलाई औरंगजेबाच्याही वरताण आहे असा उल्लेख करण्यात आला आहे. एवढंच नाही तर ज्यांना कोरोना होतो ते गां$$$** असतात असं म्हणणाऱ्या संभाजी भिडेंवर कडाडून टीका केली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात आठवडाभरासाठी लसीकरण मोहीम थांबवावी लागण्याची चिन्हं-राजेश टोपे
लसींच्या बाबतीत सध्याचे दिल्लीश्वर जी मोगलाई चालवत आहेत ती औरंगजेबाच्याही वरताण आहे. पूर्वी महाराष्ट्राचे दिल्लीतील पुढारी पक्षीय मतभेद विसरून संकट काळात महाराष्ट्राला कशी मदत होईल यासाठी आकाशपाताळ एक करत. आज चित्र पूर्णच पाटलून गेले आहे.
सामना, अग्रलेख
हे वाचलं का?
काय म्हटलं आहे सामना अग्रलेखात
लसींच्या बाबतीत सध्याचे दिल्लीश्वर जी मोगलाई चालवत आहेत ती औरंगजेबाच्याही वरताण आहे. पूर्वी महाराष्ट्राचे दिल्लीतील पुढारी पक्षीय मतभेद विसरून संकट काळात महाराष्ट्राला कशी मदत होईल यासाठी आकाशपाताळ एक करत. आज चित्र पूर्णच पाटलून गेले आहे. पुण्याचे प्रकाश जावडेकर हे दिल्लीत बसून महाराष्ट्रविरोधी बदनामी मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. केंद्र सरकार महाराष्ट्राला लसपुरवठा करण्यात जो अडेलतट्टूपणा करत आहे तो ‘शिव’काळात झाला असता तर छत्रपती शिवाजीराजे किंवा छत्रपती संभाजीराजे काय महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्यासाठी दिल्लीवर स्वारी करून पुन्हा रायगडावर परतले असते.
ADVERTISEMENT
मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पुढील वर्षभरासाठी गरजेचं – प्रकाश जावडेकर
ADVERTISEMENT
कोरोना संकटाची लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढली जात आहे. देशात कोव्हिड लढाईच्या यशाचे श्रेय कालपर्यंत मोदीच घेत होते हे प्रकाश जावडेकर विसरलेले दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोव्हिड संदर्भात जे निर्णय घेतले त्याचीच अंमलबजावणी महाराष्ट्राने केली आहे. अर्थात जावडेकर यांचा दोष नसून महाराष्ट्र द्वेष दिल्लीतील प्रत्येक राज्यकर्त्यांच्या रक्तात ठासून भरला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी तर महाराष्ट्राची लसीच्या बाबतीत असलेली न्याय्य मागणी लाथाडण्याचाच प्रयत्न केला व आरोग्यविषयक गंभीरस्थितीत वसुलीबाज वगैरे शब्द वापरून राजकारण किती गां**&& पद्धतीने सुरू आहे ते दाखवून दिले. महाराष्ट्रात लसीची आणीबाणी सुरू झाली आहे ती केंद्र सरकारच्या पक्षपाती धोरणामुळे. भाजपशासित राज्यांना जास्तीत जास्त लस साठा पुरवला गेला आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला रडतखडत 17 लाख डोस आले. महाराष्ट्राची लोकसंख्या आणि कोरोना संक्रमणाची तीव्रता जास्त असताना केंद्र सरकारने असे पक्षपातीपणाने वागणे माणुसकीला धरून नाही.
‘कोरोना गां&%$ प्रवृत्तीच्या लोकांना होणारा रोग’, संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान
भिडे गुरूजींवरही टीका
संकटाचे भान न ठेवता जी राजकीय हुल्लडबाजी सुरू आहे ती महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारी नाही. महाराष्ट्रात कृत्रीम लस तुटवडा निर्माण करून महाराष्ट्राला छळण्याचा केंद्राचा डाव आहे. संभाजी भिडे यांनी कोरोनाग्रस्तांना गां^&** असे म्हटले. त्याऐवजी लसीकरणाचे राजकारण करणाऱ्यांना फटकारले असते तर शिवरायांचे नाव राहिले असते. हे राज्य मर्दांचेच आहे हे भिडे किंवा भाजप पुढाऱ्याना माहित नाही का? भिडे गुरूजी संघ विचारांचे कडवट प्रचारक आहेत. ते छत्रपतींचे भक्त आहेत. मास्क लावू नका वगैरे असेही विचार त्यांनी मांडले. आता देशाचे पंतप्रधान काय करणार? आज प्रभू श्रीराम, विष्णू इतकेच काय छत्रपती शिवराय असते तरीही त्यांना मास्क लावूनच सिंहासानावर बसावे लागले असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT