NIA ने घेतला CIUमधील ‘या’ पोलीस अधिकाऱ्यांचा जबाब, वाझेंचं पुढे काय होणार?
मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील संशयित कारप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर आता त्यांच्याच Crime Intelligence Unit च्या इतर अधिकाऱ्यांचा देखील एनआयए जबाब नोंदवून घेत आहे. यामधून अधिक काही नवी माहिती मिळण्याची शक्यता आहे. (nia taking statement to seven police officers in the ciu) सचिन वाझे ज्या Crime Intelligence Unit मध्ये कार्यरत […]
ADVERTISEMENT
मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील संशयित कारप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर आता त्यांच्याच Crime Intelligence Unit च्या इतर अधिकाऱ्यांचा देखील एनआयए जबाब नोंदवून घेत आहे. यामधून अधिक काही नवी माहिती मिळण्याची शक्यता आहे. (nia taking statement to seven police officers in the ciu)
ADVERTISEMENT
सचिन वाझे ज्या Crime Intelligence Unit मध्ये कार्यरत होते तेथील ACP नितीन अलकनुरे, पोलीस निरीक्षक मिलींद काथे, API रियाझ काझी, API प्रकाश होवळ आणि ३ कॉन्स्टेबलचा जबाब एनआयएकडून नोंदवण्यात आला आहे.
सचिन वाझे यांच्याविषयी आता संपूर्ण माहिती एनआयएकडून गोळा करण्यात येत आहे. अशावेळी त्यांच्या खात्यातील इतर अधिकाऱ्यांचा जबाब हा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात वाझे अधिक अडकण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
‘Sachin Vaze प्रकरणामुळे मविआ सरकार पडणार नाही, विरोधकांनी भ्रमात राहू नये’
दरम्यान, NIA ने 15 मार्चला रात्री CIU च्या कार्यालयावर छापे देखील मारले होते. यावेळी एनआयएला सचिन वाझे यांच्या ठाणे येथील साकेत सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज NIA च्या हाती लागलं आहे.
ADVERTISEMENT
या छापेमारीत NIA ने लॅपटॉप, फोन, साकेत सोसायटीमधल्या सीसीटीव्ही फुटेजचा DVR ताब्यात घेतला आहे. सचिन वाझे यांनी आपल्या सोसायटीमधील सीसीटीव्हीचा DVR काढून घेतला होता. याव्यतिरीक्त सचिन वाझे यांच्या केबिनमधून अनेक महत्वाची कागदपत्र NIA च्या हाती लागलेली आहेत. आतापर्यंत या प्रकरणातला हा सर्वात मोठा पुरावा NIA च्या हाती लागल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
Sachin Vaze Case: ‘वर्षा’वर मध्यरात्रीपर्यंत खलबतं, CMची ‘यांच्यासोबत’ 4 तास चर्चा
वाझेंच्या सोसायटीमधलं ‘ते’ CCTV फुटेज NIA च्या ताब्यात
NIA ने 15 मार्चला रात्रीपासून सुरु केलेली छापेमारी 16 मार्चच्या सकाळपर्यंत सुरु होती. यादरम्यान NIA ने सात पोलीस अधिकाऱ्यांचा जवाब देखील यावेळी नोंदवून घेतला. ज्यात ACP नितीन अलकनुरे, पोलीस निरीक्षक मिलींद काथे, API रियाझ काझी, API प्रकाश होवळ आणि ३ कॉन्स्टेबलचा समावेश आहे. NIA ने यादरम्यान एक मर्सिडीज गाडीही ताब्यात घेतली होती.
NIA ने का घेतला CIU च्या अधिकांऱ्याचा जबाब
सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश ओव्हाळ, पोलिस नाईक युवराज शेलार आणि पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी देसले हे सुरुवातीला साकेत सोसायटी येथे पोहचले.
तेव्हा त्यांनी तपासाकामी सोसायटीतील CCTV फुटेज पाहिजे असं सोसायटी कार्यालयातील सदस्यांना सांगितलं. पण याबाबत लेखी पत्र दिल्याशिवाय आम्ही असं काहीच करु शकत नाही. असं सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं.
त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणारं एक पत्र सोसायटी पदाधिकाऱ्यांना दिलं होतं. या पत्राच्या शेवटी CIU DCB CID युनिटचे साहय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी यांनी सही केली आहे आणि दोन डीव्हीआर CCTV फुटेज जप्त करुन नेले होते. त्यामुळे याच फुटेजबाबत आणि संशयित स्कॉर्पिओ कारबाबत NIA ने CIU च्या अधिकाऱ्यांचा जबाब घेतला असल्याचे समजतं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT