सचिन वाझेंना ‘या’ गंभीर कलमांखाली अटक, पाहा कोणकोणती आहेत ही कलमं
मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील संशयित गाडीत स्फोटक प्रकरणी एपीआय सचिन वाझे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) काल (शनिवार) सचिन वाझेंना मुंबईतल्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं होतं. यावेळी एनआयएनं तब्बल 13 तास कसून चौकशी केली आणि चौकशीनंतर शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी त्यांना […]
ADVERTISEMENT
मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील संशयित गाडीत स्फोटक प्रकरणी एपीआय सचिन वाझे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) काल (शनिवार) सचिन वाझेंना मुंबईतल्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं होतं. यावेळी एनआयएनं तब्बल 13 तास कसून चौकशी केली आणि चौकशीनंतर शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी त्यांना गंभीर कलमांखाली अटक केलं.
एनआयएनं सचिन वाझेंवर कोणत्या कलमांखाली कारवाई केली?
हे वाचलं का?
NIA ने सचिन वाझे यांच्यावर एनआयएनं आयपीसीतल्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्ह्यांची नोंद केली आहे. यात आयपीसी कलम 286, 465, 473, 506(2), 120 B आणि स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
-
कलम 286 नुसार, जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटकं बाळगणं, इतरांच्या जीवाला धोका होईल असं वर्तन करणं, असा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
कलम 465 नुसार, – खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे
ADVERTISEMENT
कलम 473 अंतर्गत– दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती करणं
कलम 506(2) नुसार – दहशत निर्माण करणं किंवा धमकी देणं
कलम 120 B नुसार – गुन्हेगारी स्वरुपाच्या षडयंत्रात सहभाग घेण्याचा ठपका एनआयएनं सचिन वाझे यांच्यावर ठेवला आहे.
तसंच स्फोटक पदार्थ कायदा 1908 मधल्या कलम 4 अ, ब नुसार – स्फोटकं बाळगण्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सचिन वाझे यांना या रविवारीच एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एनआयएकडून त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी केली जाऊ शकते.
मोठी बातमी: 13 तासाच्या चौकशीनंतर API सचिन वाझे यांना NIA कडून अटक
25 फेब्रुवारी 2021 रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. सुरूवातीला ही कार कुणाची आहे? ही कार कुणी ठेवली? या सगळ्याची उकल झाली नव्हती. अजूनही ही कार नेमकी कुणी ठेवली ते समजू शकलेलं नाही.
वाझेंची अटक आणि POLICE लिहिलेल्या Innova कारचा नेमका संबंध काय?
मात्र, ही स्कॉर्पिओ कार मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्चला सापडला होता. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव समोर आलं होतं. अखेर संपूर्ण प्रकरणी सचिन वाझे हे NIA पुढे जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT