लता मंगेशकरांच्या मालकीच्या जयप्रभा स्टुडिओची 2 वर्षांपूर्वीच शिवसेना नेत्याच्या मुलाकडून खरेदी, कोल्हापूकर संतापले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: भारतरत्न लता मंगेशकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचं भव्य स्मारक बनवण्याची चर्चा सध्या कोल्हापुरात सुरू आहे. मात्र, लता मंगेशकर यांच्या मालकीचा जयप्रभा स्टुडिओ दोन वर्षांपूर्वीच एका शिवसेनेच्या नेत्याच्या मुलाने खरेदी केल्याची धक्कादायक माहिती आता कोल्हापूरकरांना समजली आहे. ज्यामुळे कोल्हापुरात याबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

कोल्हापूरच्या मंगळवार पेठ इथं जयप्रभा स्टुडिओ अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. भालजी पेंढारकर यांनी लता मंगेशकर यांना 1959 साली जयप्रभा स्टुडिओची तेरा एकर जागा साठ हजार रुपयाला विकली होती. अनेक नाट्य, चित्रपटाचं शूटिंग या ठिकाणी झालं आहे. भालजी पेंढारकर 1959 साली आर्थिक अडचणीत आल्यानंतर त्यांनी हा स्टुडिओ लता मंगेशकर यांना विकला. त्यानंतर लता मंगेशकर यांनी 2008 साली विवेक जैस्वाल यांना स्टुडिओचा काही भाग विक्री करून रहिवासी संकुलासाठी खरेदीचा व्यवहार झाला.

त्यावेळी कोल्हापुरातील कलाकारांनी रस्त्यावर उतरून लता मंगेशकर यांच्या जयप्रभा स्टुडिओतील रिकाम्या जागेची विक्री करत असल्याच्या निषेधार्थ अनेक वेळा आंदोलन केलं होतं. मात्र तेरा एकरपैकी दहा एकर जागा लता मंगेशकर यांनी 2008 साली विवेक ओसवाल यांना विकत दिली. तर उर्वरित स्टुडिओ साधारण तीन एकर ही जागा जनआंदोलनामुळे नंतर मंगेशकर कुटुंबीयांनी कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओमध्ये अस्तित्व कायम राहील असा शब्द दिला होता.

हे वाचलं का?

लता मंगेशकर यांचं आठ दिवसांपूर्वीच निधन झालं त्यानंतर त्यांचं स्मारक बनावं यासाठी हालचाली सुरू झाल्या. पण कोल्हापुरातील जागृत नागरिकांना हा स्टुडिओ दोन वर्षांपूर्वी मंगेशकर कुटुंबीयांनी 6 कोटी 50 लाखाचा व्यवहार करून विकला असल्याचं समोर आलं असून त्यासाठी शिवसेना माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची दोन मुले पुष्कराज राजेश क्षीरसागर, ऋतुराज राजेश क्षीरसागर, यांच्यासह सात भागीदारांसह याचा व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले.

ADVERTISEMENT

दरम्यान, कोल्हापुरात कला क्षेत्रासाठी शाहू महाराज संस्थानकडून ही जागा भालजी पेंढारकर यांना देण्यात आली होती. त्याठिकाणी जयप्रभा स्टुडिओची रचना करून भालजी पेंढारकर यांनी अनेक चित्रपटांचं शूटिंग केलं होतं. पण नंतर ती जागा त्यांनी लता मंगेशकर यांना विकली होती. कोल्हापूरमध्ये कलावंत घडावेत या हेतून या जागेत हा स्टुडिओ उभारला गेला होता.

ADVERTISEMENT

जयप्रभा स्टुडिओ वाचावा म्हणून एकीकडे कोल्हापूरकर गेली 10 ते 12 वर्षे आंदोलन करत आहेत. मात्र कोल्हापूरकरांना अंधारातच ठेवून राजकीय बड्या नेत्याच्या मुलांनी हा जयप्रभा स्टुडिओ 6 कोटी 50 लाखाचा व्यवहार करून आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती आज समोर आली आहे.

आठ दिवसांपूर्वीच लता मंगेशकर यांचं निधन झालं त्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील व मुख्यमंत्री स्तरावर लता मंगेशकर यांचे स्मारक बनावं याची चर्चा सुरू होती. यासाठी जयप्रभा स्टुडिओची चाचपणी करण्यात येत असतानाच हा स्टुडिओ 15 फेब्रुवारी 2020 रोजी विक्री झाल्याचे स्पष्ट झालं.

दरम्यान, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व कोल्हापूर उत्तर विधानसभेचे शिवसेना माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, ‘मुलांनी हा व्यवहार केलाय हे मला माहीतच नाही.’ यावेळी राजेश क्षीरसागर असं म्हणाले की, ‘कोल्हापूरकरांसाठी हा स्टुडिओ परत देऊ. सरकारने हा खरेदी केला तर मी व माझी मुलं तो स्टुडिओ परत देऊ.’

‘हा स्टुडिओ महापालिकेने आपल्या ताब्यात घेऊन सरकारने पर्यायी जागा द्यावी.’ अशी मागणीही राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.

कोल्हापूरकरांना अंधारात ठेवून लता मंगेशकर यांच्या वतीने काही जणांनी मध्यस्थ करून हा व्यवहार घडवून आणल्याची माहिती प्रजासत्ताक सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई, व कृती समितीचे समन्वयक रमेश पवार, अशोक पवार, यांनी सांगितले.

जयप्रभा स्टुडिओचे भालजी पेंढारकर यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक अर्जुन नलवडे याबाबत बोलताना म्हणाले की, ‘झालेला व्यवहार गैर असून सखोल चौकशी करावी. भालजी पेंढारकर यांच्या पडत्या काळात त्यांनी आर्थिक समस्या असताना लता दीदींना हा स्टुडिओ विकला होता.’

‘कोल्हापूरच्या अनेक लोकांना या स्टुडिओमध्ये काम करण्याची संधी मिळत होती. अलीकडच्या दहा ते पंधरा वर्षात कोल्हापूरकरांनी हा स्टुडिओ अस्तित्व कायम राखण्यासाठी प्रयत्न केला पण आज हा संपूर्णपणे विकल्याचे माहिती समजली. हे दुर्दैव मानावे लागेल. आता कोल्हापुरातील कलावंत कलाकार यांनी स्टुडिओ अस्तित्व कसं राहील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.’

ठरलं! लता मंगेशकरांच्या नावे उभारलं जाणार जागतिक दर्जाचं संगीत महाविद्यालय

यासंदर्भात काल सायंकाळी मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात सदस्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली या बैठकीत जयप्रभा स्टुडिओसाठी उद्यापासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT