पायरेटेड साईट्सवर ‘राधे’चं स्ट्रिमिंग झाल्याने संतापला सलमान खान, म्हणाला…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ईदच्या निमित्ताने अभिनेता सलमान खानचा चित्रपट ‘राधे- युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ सिनेमा रिलीज झाला. रिलीज होताच चित्रपटाने 4.2 दशलक्ष व्यूजचा इतिहास निर्माण केला आहे. पण एकीकडे सलमान आपल्या सिनेमाच्या कामगिरीवर खूश आहे तर दुसरीकडे पायरेटेड साइटवर हा सिनेमा लीक झाल्याने तो खूप संतापला आहे. सलमानने ट्विट करून पायरसीविरोधात नाराजी व्यक्त केलीये.

ADVERTISEMENT

यासंदर्भात सलमानने सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सलमान खान म्हणतो, “आम्ही पर व्हू 249 इतक्या कमी दरात आमचा ‘राधे’ सिनेमा पाहण्यासाठी उपलब्ध केला आहे. तरीही काही लोकं पायरेटेड साईट्सवर ‘राधे’ सिनेमाचं बेकायदेशीर प्रक्षेपण करत आहेत. हा एक गंभीर गुन्हा आहे. सायबर सेल या सर्व बेकयदेशीर साईट्सवर कारवाई करत आहे.”

सलमान त्याच्या पोस्टमध्ये पुढे म्हणतो, “प्लीज तुम्ही पायरसीचा भाग बनू नका. असं केल्यास सायबर सेल तुमच्यावरही कारवाई करू शकते. कृपया हे लक्षात घ्या नाहीतर सायबर सेलच्या कारवाईमुळे तुम्ही अडचणीत सापडण्याची शकता आहे.”

हे वाचलं का?

दरम्यान सिनेमा रिलीज करण्यापूर्वीच अभिनेता सलमान खानने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हीडिओच्या माध्यमातून त्याने चाहत्यांना पायरसीपासून दूर राहण्याचं आवाहन केलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT