सलमानचा लहान मुलांसोबत धमाल डान्स, व्हायरल व्हिडीयो पाहून फॅन्स खूश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेता सलमान खान सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असतो. इतकंच नव्हेतर अनेक सामाजिक कार्यांमध्ये देखील त्याचा सहभाग दिसून येतो. त्याच्या या कामाचं त्याचे फॅन्सही नेहमी कौतुक करतात. तर नुकतंच सलमानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक जुना व्हिडीयो शेअर केलाय ज्यामुळे पुन्हा एकदा त्याचे फॅन्स खूश झालेत.

ADVERTISEMENT

21 मार्च रोजी सलमानने डाऊन सिंड्रोम दिनानिमित्त हा व्हिडीयो शेअर केला होता. या व्हिडीयोमध्ये तो लहान मुलांसोबत डान्स करतोय. तर काही लहान मुलांच्या डान्सची त्याने तारिफही केलीये. शिवाय सलमानने दिव्यांग मुलांसोबत धमाल देखील केलीये. सलमानसोबत डान्स करण्याचा आनंद त्या चिमुकल्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरही झळकताना दिसतोय.

या थ्रोबॅक व्हिडीयोला सलमानने कॅप्शन पण दिलंय. यामध्ये सलमान म्हणतो, “उमंगच्या मुलांसोबतच डान्स. देवाचे आशिर्वाद नेहमी तुमच्यासोबत राहु दे. लव्ह यू ऑल.” सलमान खानने बिना काक यांच्या उमंग नावाच्या संस्थेला भेट दिली होती. त्यावेळीचा हा व्हिडीयो असून सलमानने तो शेअर केला आहे. दबंग सिनेमाच्या शूटींगदरम्यान अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत या मुलांना भेट दिली होती.

हे वाचलं का?

दरम्यान लवकरच सलमान खानचा राधे हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खास ईदच्या निमित्ताने म्हणजेच 13 मेच्या दिवशी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्यात येण्याची घोषणा सलमानने केली होती. तर सलमान खानच्या पठाण सिनेमात देखील पाहुणा कलाकार म्हणून तो दिसणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT