Lockdown आणि कोरोनाला कंटाळून केशकर्तनालय दुकानदाराची आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे आणि लॉकडाऊन लावण्याची तयारी सुरू आहे. अशा सगळ्या परिस्थितीत लॉकडाऊन, कोरोना आणि गरीबीला कंटाळून एका केशकर्तनालय दुकानदाराने आत्महत्या केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन आहे. संपूर्ण राज्यभरात मिनी लॉकडाऊन आहेच. आठ दिवसांसाठी पूर्ण लॉकडाऊन लावायचा की 14 दिवसांसाठी याचा निर्णय आता बुधवारी होऊ शकतो. अशा सगळ्या परिस्थितीत ही घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

नागपूर : ८१ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीची आत्महत्या

शासनाने घालून दिलेल्या लॉकडाऊनच्या नियमांनुसार केशकर्तनालयं म्हणजेच सलूनही बंद करण्यात आली आहेत. यामुळे उस्मानाबादमधल्या एका सलून चालवणाऱ्या दुकानदाराने आत्महत्या केली आहे. मनोज झेंडे असं आत्महत्या करणाऱ्याचं नाव आहे. आत्महत्येच्या आधी त्याने एक चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. आपण लॉकडाऊन, कोरोना आणि गरीबीला कंटाळून आयुष्य संपवत आहोत असंही त्याने या चिठ्ठीत म्हटलं आहे.

हे वाचलं का?

पुण्यात इंजिनिअर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मनोजने चिठ्ठीत काय म्हटलं आहे?

ADVERTISEMENT

कोरोनाला आणि गरीबीला कंटाळून मी आत्महत्या करतो आहे. आमची दुकानं बंद झाली आहे, पाच हजार रूपयांवर आम्ही घर कसं चालवायचं? मी माझ्या इच्छेनुसार आयुष्य संपवतो आहे. माझ्या मरणाचा दोष माझ्या घरातल्यांना देऊ नये. तसंच त्यांच्यावर कोणतेही आरोप करू नये. माझ्या भावावर, पुतण्यावर , बायकोवर कोणतेही आरोप करू नयेत अशी कळकळीची विनंती पोलिसांना आहे. ५ हजारांमध्ये घर कसं भागवायचं ते मला समजत नसल्याने मी माझं आयुष्य संपवतो आहे.

ADVERTISEMENT

असा आशय असलेली चिठ्ठी मनोज झेंडे या सलून दुकानदाराने लिहिली आहे. त्यानंतर विषारी औषध घेऊन त्याने त्याचं आयुष्य संपवलं आहे. मनोज झेंडे यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुले असं कुटुंब आहे. त्यांनी विषारी औषध प्यायल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने उस्मानाबाद जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार करत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT