भारत निर्लज्ज माणसांचा देश; संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान
वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले शिव प्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांचा बोलताना पुन्हा एकदा तोल सुटला. ‘स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे भारत आहे. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात निर्लज्जपणात भारत पहिल्या क्रमांकावर आहे आणि याची कुणाला लाज वाटत नाही’, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. सांगलीमध्ये झालेल्या दुर्गामाता दौडीच्या समारोप प्रसंगी […]
ADVERTISEMENT
वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले शिव प्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांचा बोलताना पुन्हा एकदा तोल सुटला. ‘स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे भारत आहे. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात निर्लज्जपणात भारत पहिल्या क्रमांकावर आहे आणि याची कुणाला लाज वाटत नाही’, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. सांगलीमध्ये झालेल्या दुर्गामाता दौडीच्या समारोप प्रसंगी बोलत होते.
ADVERTISEMENT
संभाजी भिडे काय म्हणाले?
‘जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश! मग आपला, देशाचा क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे. कुठल्या गोष्टीत? लोकसंख्येमध्ये आपल्याला जमलं नाही, चीन पुढे आहे. जो आपला कट्टर दुश्मन, वैरी, मारेकरी, गनिम, शत्रू आहे; पण हिंदूंना मेंदू असतो. यात आपला क्रमांक एक आहे. तो म्हणजे निर्लज्जपणात!’
हे वाचलं का?
‘जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात पारतंत्र्य, परदास्य, परवशता, गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा, लाज वाटत नाही, अशा बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा देश जगात आहे. दीर्घ काळ परकीयांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे.’
‘कोरोना म्हणजे चीन-पाकिस्तान या आपल्या शत्रू राष्ट्राचा काल्पनिक रीत्या भारतात आणलेला छुपा वार आहे. तो काही खरा नसून थोतांड आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे. दुर्देवाने आपल्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या अंतःकरणात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची वस्ती असती, तर सबंध देशाचं नेतृत्व करणारे ठरले असते.’
ADVERTISEMENT
‘आदिलशाही, निजामशही, कुतुबशाही यांनी आपल्या समाजाचे नुकसान केले आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी झटले. आता आपली वेळ आहे. यासाठी प्रयत्न करूया. जोपर्यंत हिंदूराष्ट्राची जाण असणारे सरकार सत्तेत येत नाही, तोपर्यंत आपले हिंदूराष्ट्र निर्माण होणार नाही. हे सरकार गोव्यापासून मुंबई-कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत सर्व ठिकाणी दारूची दुकानं सुरू करू शकते. आपल्या दुर्गा दौडीला परवानगी नाकारणारे हे नाकर्ते सरकार आहे’, अशी टीका संभाजी भिडे यांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT