समीर वानखेडे हिंदू असते तर निकाह झालाच नसता; मौलाना अहमद यांचा खुलासा

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी वानखेडे (sameer wankhede) मुस्लिम असताना अनुसूचित जातीतील दाखवून नोकरी मिळवल्याचा आरोप केला. हा आरोप वानखेडेंनी फेटाळला होता. मात्र, निकाह लावून देणाऱ्या मौलाना मुजम्मिलल अहमद (Maulana Muzammil Ahmed) यांनी समीर वानखेडे मुस्लिम असल्यानेच निकाल लावला असल्याचं म्हटलं आहे. (Maulana Muzammil Ahmed who solemnised 1st marriage of Sameer Wankhede says it was a muslim nikah)

ADVERTISEMENT

Nawab Malik: ‘वानखेडेजी तर मी राजीनामा देऊन राजकारणही सोडेन’, नवाब मलिकांची मोठी घोषणा

मौलाना मुजम्मिलल अहमद यांनी हा खुलासा केला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारावर अनुसूचित जाती प्रवर्गातून नोकरी मिळवल्याचा दावा केला आहे. मलिक यांनी वानखेडे यांच्या पहिल्या निकाहचे फोटो आणि निकाहनामा ट्वीट केला होता. त्यानंतर आता निकाह लावणाऱ्या मौलाना मुजम्मिल अहमद यांनीच या प्रकरणाबद्दल खुलासा केला आहे.

हे वाचलं का?

मौलाना अहमद यांनी 2006 मध्ये समीर वानखेडे यांचा शबाना कुरेशी यांच्याशी निकाल लावला होता. याबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘समीर वानखेडे आणि त्यांचे वडील मुस्लीमधर्मीय होते. त्यामुळेच त्यांचा (समीर वानखेडे) शबाना कुरेशी यांच्याशी निकाह लावण्याला परवानगी देण्यात आली. समीर वानखेडे आणि त्यांचे वडील मुस्लीम नसते, तर निकाह लावला गेला नसता. शरियतमध्ये परवानगीच दिली गेली नसती. निकाह लावला त्यावेळी संपूर्ण कुटुंब मुस्लीम होतं’, असं त्यांनी म्हटलं आहे.

समीर वानखेडे चारी बाजूने अडकले?, NCB टीमच्या आधी मुंबई पोलिसांनी सुरु केला ‘त्या डील’चा तपास

ADVERTISEMENT

‘आज ते काहीही म्हणत असले, तरी निकाह वेळी समीर मुस्लीम होते. शबाना मुस्लीम होती. लोखंडवाला येथे मोठं मोठे लोक तिथे लग्न करतात. तिथे दोन हजार लोक असतील. पंधरा मिनिटात निकाह लावून काझी परत जातो. इस्लामी पद्धतीने हा विवाह झाला. सगळे मुस्लीम होते. साक्षीदार मुस्लीम होते. वकील मुस्लीम होते आणि आईवडील सुद्धा मुस्लीम होते. जर मुलगा वा मुलगी हिंदू असल्याचं कळलं असतं, तर काझींनी निकाह लावला नसता. शरियतमध्ये अशा स्थितीत निकाह होत नाही. शरियतच्या विरोधात काझी करू शकत नाही. त्यावेळी दोघेही मुस्लीम होते’, असं मौलाना मुजम्मिल अहमद यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचा पुन्हा ‘ट्वीट’वार; ‘निकाहनामा’ची दिली माहिती

समीर वानखेडे यांचा डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत 2006 मध्ये निकाह झाला होता. त्यानंतर त्यांचा 2016 मध्ये सहमतीने तलाक झाला होता. समीर वानखेडे यांनी 2017 मध्ये दुसऱ्यांदा विवाह केला. अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी ते दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT