समीर वानखेडे दिल्लीतील NCB मुख्यालयात का गेले?
नवी दिल्ली: मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी लाचखोरीच्या आरोपांची चौकशी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB)सुरू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे हे आज (मंगळवारी) NCB च्या महासंचालकांची भेट घेणार आहेत. दरम्यान, दिल्लीत पोहोचल्यावर समीर वानखेडेंनी पत्रकारांना सांगितले की, मला खंडणीच्या आरोपासंबंधी बोलावण्यात आलेलं नाही. आज तक/इंडिया टुडेला मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे जे क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी लाचखोरीच्या आरोपांची चौकशी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB)सुरू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे हे आज (मंगळवारी) NCB च्या महासंचालकांची भेट घेणार आहेत. दरम्यान, दिल्लीत पोहोचल्यावर समीर वानखेडेंनी पत्रकारांना सांगितले की, मला खंडणीच्या आरोपासंबंधी बोलावण्यात आलेलं नाही.
आज तक/इंडिया टुडेला मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे जे क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा तपास करत आहेत. ज्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याचवेळी समीर वानखेडे आज दिल्लीतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुख्यालयात एसएन प्रधान यांची भेट घेणार आहेत.
सूत्रांच्या मते, समीर वानखेडे हे नियमित आढावा बैठकीसाठी एनसीबी प्रमुख यांची भेट घेणार आहेत. याच बैठकीसाठी समीर वानखेडे हे दिल्लीला आले असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, असं असलं तरीही आर्यन खानचा समावेश असलेल्या क्रूझ ड्रग्स प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.
काल मुंबईहून दिल्लीला पोहोचल्यानंतर समीर वानखेडे म्हणाले की, ‘मला NCB कडून बोलावण्यात आलेलं नाही. मी इथे येण्याचं कारण हे पूर्णपणे वेगळं आहे. माझ्यावर जे आरोर करण्यात आलेले आहेत ते निराधार आहेत.’
