Train Viral Video: 'लाडक्या बहिणीचे 3000 आले, आता भाऊजी म्हणणार...', समोसा विकण्याची भन्नाट स्टाईल!
Samosa Vendor Viral Video: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वत्र गाजावाज होत असतानाच आता ट्रेनमधील एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लाडकी बहीण योजनेवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच समोसा विक्रेत्याचा मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ट्रेनमधील समोसा विक्रेत्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल
लाडकी बहीण योजनेवर समोसा विक्रेत्याचृी भन्नाट डायलॉगबाजी
समोसा व्रिकेत्याच्या व्हिडीओनं इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ
Samosa Vendor Viral Video: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वत्र गाजावाज होत असतानाच आता ट्रेनमधील एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लाडकी बहीण योजनेवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच समोसा विक्रेत्याचा मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले की नाही? असा प्रश्न अनेक महिलांना पडला असेल. परंतु, एका समोसा विक्रेत्याच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडीओला जवळपास दहा हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तसच काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.
ADVERTISEMENT
"चला वीसचे चार समोसे...लाडक्या बहिणीचे चार समोसे... आता भाऊजी म्हणणार नाहीत तू वीस का खर्च केले, असं म्हणत समोसा विक्रेत्यानं ट्रेनमधील प्रवाशांचं मनोरंजन केलं." लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून दीड कोटी महिलांच्या खात्यावर १५०० रुपये जमा झाल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आलीय. परंतु, काही महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले नाहीत, अशीही चर्चा रंगू लागली आहे. अशातच समोसा विक्रेत्याचा व्हिडीओमुळं विविध चर्चांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा >> THAR नव्हे, आनंद महिंद्रांनी थेट विमानच बनवलं, VIDEO पाहून नेटकरीही चक्रावले
लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
"लाडकी बहीण योजना मतं मिळवण्यासाठी सुरु केली नाही. महिलांना सन्मान मिळाला पाहिजे. त्यांना त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. लाडकी बहीण योजनेमुळं विरोधी पक्षाचं टेन्शन वाढलं आहे. सरकारकडून महिन्याला फक्त १५०० रुपये दिले जात आहे. सरकार एव्हढ्यावरच थांबणार नाही. महिलांनी महायुती सरकारला मजबूत केलं पाहिजे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार ४००० रुपये? CM शिंदेंनी ठेवली एक अट
जेणेकरून या योजनेची रक्कम ४ हजार रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. जर काँग्रेस सत्तेत असती, तर भष्ट्राचारामुळं लोकांना ३ हजार रुपयांऐवजी फक्त ४०० रुपयेच देण्यात आले असते. पण महायुती सरकारला कल्याणकारी योजनांसोबतच महिलांना सक्षम बनवायचं आहे. महिलांना लखपती बनवायचं आहे."
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT