‘शेवाळे 2024 मध्ये खासदार नसतील’, संजय राऊतांनी बोम्मईंनाही सुनावलं

मुंबई तक

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागलं. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर झालेल्या आरोपांवरून शिंदे गटाने सल्ला दिला होता. त्या सल्ल्यावरून संजय राऊतांनी शिंदे गटाच्या खासदारांवर पलटवार केलाय. दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी बोम्मईंवर टीका केली. बोम्मईंनी संजय राऊतांना चीनचे एजंट म्हटलं. त्यावर राऊत म्हणाले, ‘ते जर आम्हाला चीनचे एजंट म्हणत असतील, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागलं. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर झालेल्या आरोपांवरून शिंदे गटाने सल्ला दिला होता. त्या सल्ल्यावरून संजय राऊतांनी शिंदे गटाच्या खासदारांवर पलटवार केलाय.

दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी बोम्मईंवर टीका केली. बोम्मईंनी संजय राऊतांना चीनचे एजंट म्हटलं. त्यावर राऊत म्हणाले, ‘ते जर आम्हाला चीनचे एजंट म्हणत असतील, तर चीनच्या पंतप्रधानांना, चीनच्या राष्ट्रप्रमुखांना अहमदाबादमध्ये बोलवून, झोपाळ्यावर झुलवून पापडी गाठिया खायला घालवून त्यांचा सन्मान करणाऱ्यांना काय म्हणाल?’ असा सवाल संजय राऊतांनी बोम्मईंना केलाय.

संजय राऊत पुढे म्हणाले, ‘आम्ही चीनचे एजंट कसे, चीनने जगभरात घुसखोरी सुरू केलीये आणि त्यात आपला देशही आहे. त्याच पद्धतीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न कर्नाटक राज्य हे सांगली, सोलापूरात करत आहे. बेसावध पद्धतीने. तुम्ही जर असं करत असाल तर आम्हालाही तोच मार्ग अवलंबवावा लागेल, असं मी म्हटलंय.’

‘तुम्हाला चीनचा इतका तिटकारा असेल, तर पंतप्रधानांचा निषेध करा. त्यांनीच चीनचे दरवाजे उघडले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला आग लावण्याचं काम बोम्मई करत आहेत. दिल्लीत गृहमंत्र्यांसमोर (अमित शाह) जे ठरलं होतं, हे ते मानायला तयार नाहीत. आपल्याच पक्षाच्या नेत्याचा आदेश मानायला तयार नाहीत. ते आमचे संस्कार आणि संस्कृती काढताहेत. आम्हाला त्यांनी शिकवू नये,’ असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी बसवराज बोम्मईंना दिलं.