Satara Double Murder : अनैतिक संबंधांमधून पत्नीसह प्रेयसीचाही काढला काटा, आरोपी पतीला अटक
साताऱ्याच्या व्याहळी भागात झालेल्या खून प्रकरणात फरार असलेला आरोपी नितीन गोळे याला अटक करण्यात पोलिसांना आज यश आलं. साताऱ्याच्या भुईंज पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी बेळगावातून नितीनला अटक केली. यावेळी चौकशीदरम्यान नितीनने दोन वर्षांपूर्वी आपण आपल्या पत्नीचीही हत्या केल्याची कबुली दिली. पत्नीची हत्या करुन वाई पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार केल्याचं नितीनने पोलिसांना सांगितलं. पत्नीचा मृतदेह […]
ADVERTISEMENT
साताऱ्याच्या व्याहळी भागात झालेल्या खून प्रकरणात फरार असलेला आरोपी नितीन गोळे याला अटक करण्यात पोलिसांना आज यश आलं. साताऱ्याच्या भुईंज पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी बेळगावातून नितीनला अटक केली. यावेळी चौकशीदरम्यान नितीनने दोन वर्षांपूर्वी आपण आपल्या पत्नीचीही हत्या केल्याची कबुली दिली. पत्नीची हत्या करुन वाई पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार केल्याचं नितीनने पोलिसांना सांगितलं. पत्नीचा मृतदेह डोंगरभागात पुरुन टाकल्याची माहिती नितीनने दिली. यानंतर संध्या शिंदे हिचा देखील गळा आवळून खून केल्याचं आरोपीने मान्य केल्यामुळे वाई तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
काही वर्षांपूर्वी सातऱ्यात डॉ. संतोष पोळने अशाच पद्धतीने ६ महिलांचा खून करुन त्यांचे मृतदेह आपल्या अंगणात आणि फार्म हाऊसमध्ये खड्डे करुन पुरले होते. नितीन गोळेच्या कबुलीजबाबानंतर वाईकरांना संतोष पोळ प्रकरणाची आठवण झाली आहे.
Viral Video : माझ्या नवऱ्याची मैत्रीण! बायकोने नवऱ्याच्या मैत्रिणीला हॉटेलजवळ गाठत धू-धू धुतलं
हे वाचलं का?
असा लावला गेला आरोपीचा छडा –
३१ जुलै रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात संध्या शिंदे या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. ३ ऑगस्ट रोजी संध्या शिंदे यांचा मृतदेह भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडून आला. एका उसाच्या शेतात संध्या यांचा मृतदेह सापडला, पोलिसांनी आधारकार्ड व इतर कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर मृतदेह संध्या शिंदे यांचाच असल्याची खात्री पटवली. शवविच्छेदनासाठी मृतदेह सातारा येथे पाठवण्यात आला. संध्या शिंदे यांचे हात बांधलेले होते, त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला होता.
ADVERTISEMENT
संध्या शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी भुईंज पोलीस ठाण्यात नितीन गोळेने संध्याची हत्या केल्याची तक्रार दाखल केली. भुईंज पोलिसांनी नितीन गोळेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतू तोपर्यंत तो फरार झाला होता. यानंतर मोबाईल लोकेशन ट्रॅक करुन नितीन हा बेळगावात लपून बसल्याचं पोलिसांना समजलं. यानंतर भुईंज पोलिसांच्या पथकाने बेळगावात सापळा रचून नितीन गोळेला अटक केली. पोलीस चौकशीत नितीनने दोन्ही हत्यांची कबुली दिली असून न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT