Valentine day : गायीला मिठी मारुन साजरा करा यंदाचा व्हॅलेंटाईन डे; कोणी केली मागणी?
Valentine day : मुंबई : फेब्रुवारी महिन्यातील दुसरा आठवडा हा प्रेमी युगुलासाठी हवाहवासा वाटणार आठवडा म्हणून ओळखला जातो. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंतचा प्रत्येक दिवस मग त्यात प्रपोज डे, रोज डे, चॉकलेट डे, टेडी डे असे अनेक वेगवेगळे पार्टनरसोबत अधिक खास पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे‘ला […]
ADVERTISEMENT
Valentine day :
ADVERTISEMENT
मुंबई : फेब्रुवारी महिन्यातील दुसरा आठवडा हा प्रेमी युगुलासाठी हवाहवासा वाटणार आठवडा म्हणून ओळखला जातो. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंतचा प्रत्येक दिवस मग त्यात प्रपोज डे, रोज डे, चॉकलेट डे, टेडी डे असे अनेक वेगवेगळे पार्टनरसोबत अधिक खास पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे‘ला पार्टनरप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं जातं.
या दरम्यान, केंद्रीय मत्स्य पालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पशु कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ हा ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. 14 फेब्रुवारीला गायीला मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावं आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ हा ‘काऊ हग डे’ साजरा करावा, असं आवाहन पशु कल्याण मंडळानं केलं आहे. (celebrate the day of February 14 by hugging cows as it would bring emotional richness and collective happiness.)
हे वाचलं का?
“सर्व गाईप्रेमींनी गाईचे महत्त्व लक्षात घेऊन 14 फेब्रुवारी हा दिवस गायींना मिठी मारून साजरा करावा, यामुळे जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेनं परिपूर्ण बनवण्यासाठी मदत होईलं. गाय भारतीय संस्कृतीचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आपल्या जीवनाचा आधार आहे. गाय पशुसंपत्ती आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. तिला ‘कामधेनू’ आणि ‘गौमाता’ म्हणून ओळखलं जातं, असं पशु कल्याण मंडळाने त्यांच्या आवाहन पत्रकात म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
गाईचे जतन केल्यानं ‘पाश्चात्य संस्कृतीच्या’ प्रगतीमुळे लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या वैदिक परंपरांचे जतन करण्यात मदत होईल, असं मंडळानं म्हटलं आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटामुळे आपण आपली भौतिक संस्कृती आणि वारसा जवळजवळ विसरलो आहोत. म्हणून, सर्व गोप्रेमींनी 14 फेब्रुवारी हा दिवस गाईला मिठी मारुन साजरा करावा, असं ही या पत्रकात लिहिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT