Maharashtra Unlock News : आगामी शैक्षणिक वर्षातही शाळा बंदच? मुख्यमंत्र्यांचे भाषणातून सूचक संकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांवरुन वादंग सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी शैक्षणिक वर्षातही शाळा बंदच राहतील असे सूचक संकेत दिले आहेत. रविवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना राबवण्यात आलेल्या उपाययोजना आणि तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केलेली तयारी याची माहिती दिली.

ADVERTISEMENT

कोरोनाची साथ ही सरकारी योजना नाही, लॉकडाउनला विरोध करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावलं

“शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला महत्वाचा घटक आहे. यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांचं मुल्यांकन करुन त्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांबाबतही आम्ही लवकरच निर्णय घेऊ. परंतू शिक्षणाच्या बाबतीत आता केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठी एक धोरण ठरवण्याची गरज आहे. लाटांमागून लाटा येत असताना आपल्याला शिक्षणाच्या बाबतीत क्रांतीकारक निर्णय घेणं गरजेचं आहे. कोरोनाचा प्रभाव आणखी वाढला तर वर्क फ्रॉम होम प्रमाणे शिक्षणही ऑनलाई सुरु करता येईल का? त्यासाठी काय तयारी करावी लागेल याचे प्रयत्न सुरु आहेत.”

हे वाचलं का?

Maharashtra Unlock News : चक्रीवादळ, कोरोना ते लॉकडाउन, जाणून घ्या उद्धव ठाकरेंच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे

शिक्षणाच्या बाबतीत गोष्टी हळुहळु पूर्वपदावर येणं गरजेचं आहे. रुग्णसंख्या वाढली की लॉकडाउन करायचं…कमी झाली की सगळं उघडायचं हे करुन आता चालणार नाही. दहावी आणि बारावीच्या परीक्षांनंतर भविष्यात काय करायचं याचा निर्णय विद्यार्थी घेत असतात. अशावेळी केंद्र सरकारवने या बाबतीत पुढाकार घेऊन संपूर्ण देशासाठी एक धोरण आखून देण्याची गरज असल्याचं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.

ADVERTISEMENT

राज्यात दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. सुनावणीदरम्यानही राज्य सरकारने परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं. बारावीच्या विद्यार्थ्यांचं मुल्यांकन कसं करायचं याबाबतीतही सरकार लवकरच धोरण जाहीर करणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भाषणात दिलेले संकेत पाहता आगामी काळातही राज्यातील शाळा बंदच राहतील असं दिसत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT