NSA अजित डोवालांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न, आरोपी म्हणतो; मला रिमोट कंट्रोलनं चालवलं जात आहे!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्या घरात एका व्यक्तीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7.45 च्या सुमारास त्या व्यक्तीने अजित डोवाल (Ajit Doval) यांच्या घरात कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी योग्य वेळी त्या व्यक्तीला थांबवून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे समजते.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीला पकडल्यानंतर तो विचित्र पद्धतीने बडबडत होता. त्याच्या शरीरात कोणीतरी चिप टाकली आहे आणि तो रिमोटने त्याला नियंत्रित करतोय… अशा प्रकारचं असंबद्ध तो बोलत होता. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्याजवळ कोणतीही चिप आढळून आली नाही.

ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती कर्नाटकातील बंगळुरू येथील रहिवासी आहे. शंतनू रेड्डी असे त्यांचे नाव असल्याचे समजते आहे. नोएडाहून लाल रंगाची एसयूव्ही कार त्याने भाड्याने घेतली होती आणि तीच कार घेऊन तो डोवाल यांच्या घरापर्यंत पोहोचला होता. रेड्डी कार थेट घराच्या आवारात घुसविण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला पकडण्यात आले. सध्या पोलीस रेड्डी तिथे नेमका का आला होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे वाचलं का?

NSA अजित डोवाल यांचे संरक्षण CISF करत आहे. त्यांना गृह मंत्रालयाकडून Z+ श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे.

झेड प्लस सिक्युरिटीमध्ये काय असते?

ADVERTISEMENT

प्रत्येक VVIP ज्यांना Z प्लस श्रेणीची सुरक्षा दिली जाते, त्यांच्याभोवती कडेकोट सुरक्षारक्षकांचा पहारा असतो. यात 58 कमांडो असतात. यात 10 सशस्त्र स्टॅटिक गार्ड, 6 PSO, 24 जवान, 5 वॉचर्स (दोन शिफ्टमध्ये) यांचा समावेश असतो.

ADVERTISEMENT

भारताचा ‘जेम्स बाँड’ दहशतवाद्यांच्या रडारवर

भारताचे ‘जेम्स बॉण्ड’ म्हणून ओळखले जाणारे अजित डोवाल हे पाकिस्तान आणि चीनच्या डोळ्यात कायमच सलत आले आहेत. डोवाल हे अनेक दहशतवादी संघटनांचेही लक्ष्य आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जैशच्या एका दहशतवाद्याकडून डोवाल यांच्या कार्यालयाची रेकी केल्याचा देखील व्हीडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ दहशतवाद्याने पाकिस्तानी हँडलरला पाठवला होता. यानंतर डोवाल यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली होती.

उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे जन्मलेले अजित डोवाल हे केरळ केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. 1972 मध्ये ते भारताची गुप्तचर संस्था IB शी संबंधित होते. गुप्तचर बनून डोवाल यांनी अनेक पराक्रम गाजवले आहेत. गुप्तहेर म्हणून सुमारे सात वर्षे ते पाकिस्तानातही राहिले होते.

‘हम तुम्हे मारेंगे और…’; बायडेन यांनी केली राज कुमारांची कॉपी; व्हिडीओ होतोय व्हायरल

‘ऑपरेशन ब्लू स्टार’, ‘ऑपरेशन ब्लू थंडर’मध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्याच वेळी जेव्हा 1999 मध्ये विमानाचे अपहरण झाले तेव्हा त्यांना सरकारच्या वतीने चर्चेसाठी महत्त्वाची भूमिका देण्यात आली होती.

14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NSA अजित डोवाल यांच्यावर पाकिस्तानला योग्य धडा शिकविण्याची जबाबदारी सोपवली होती. यानंतर, 26 फेब्रुवारी 2019 रोजी पहाटे 3 वाजता भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून आणि बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT