शाळेत खिचडीऐवजी वाईन द्या अन् मंदिरातही व्यवस्था करा; बंडातात्या कराडकरांचे सरकारला टोले
सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीची करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे सरकार टीकेचं धनी ठरताना दिसत आहे. सरकारच्या निर्णयाला भाजपने विरोध दर्शवला असून, टीकाही केली जात आहे. त्यातच आता वारकरी संप्रदायातील बंडातात्या कराडकर यांनी या निर्णयावरून सरकारला खडेबोल सुनावले आहेत. सुपरमार्केटमधून वाईन विक्रीच्या निर्णयावर बंडातात्या कराडकर यांनी एका व्हिडीओतून आपलं म्हणणं मांडलं […]
ADVERTISEMENT
सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीची करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे सरकार टीकेचं धनी ठरताना दिसत आहे. सरकारच्या निर्णयाला भाजपने विरोध दर्शवला असून, टीकाही केली जात आहे. त्यातच आता वारकरी संप्रदायातील बंडातात्या कराडकर यांनी या निर्णयावरून सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
सुपरमार्केटमधून वाईन विक्रीच्या निर्णयावर बंडातात्या कराडकर यांनी एका व्हिडीओतून आपलं म्हणणं मांडलं आहे. ‘काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. प्रत्येक सुपरमार्केटमध्ये आणि किराणा दुकानात वाईन विक्री करण्याचा धाडसी निर्णय घेतला, त्याबद्दल सरकारचं त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि महाराष्ट्राचे शहेनशहा शरद पवार या तिघांचंही अभिनंदन करतो’, असा टोला बंडातात्या कराडकर यांनी लगावला.
वाईन उद्योजकासोबत कुणाची बैठक झाली?; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
‘आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षामध्ये एक धाडसी पाऊल उचलून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाचा आहे. आतापर्यंत सामान्य माणसाला दारूच्या दुकानात जावं लागतं होतं. आता त्यांना दुकानात जावं लागणार नाही. किराणा दुकानात उपलब्ध होईल. त्यामुळे सर्व लोकांना दारूचं व्यसन आणि दुष्परिणाम होण्यासाठी चांगली मदत होईल’, अशी टीका बंडातात्या कराडकर यांनी केली.
‘अगोदरच आपण लोकांच्या मानगुटीवर कोरोनाचं नसलेलं भूत बसवलेलं आहे. त्यामुळे समाज आधीच भयभीत असून, या भयभीत समाजाला आणखी आत्महत्येकडे जाण्यासाठी वाईन विक्रीचा चांगला उपयोग होईल.’
ADVERTISEMENT
शेतकऱ्यांच्या मुलांना दारुच्या नादी लावणार आहात का?; चंद्रकांत पाटलांचा सरकारला सवाल
ADVERTISEMENT
‘माझी शासनाला विनंती आहे की आपण भाजीमंडईत सुद्धा दारू उपलब्ध केली, तर त्याचाही फायदा होईल. सकाळी वृत्तपत्र वाटणाऱ्यांमार्फत दारूची पाऊच देण्याची व्यवस्था केली. घर न सोडता दारू मिळण्याची व्यवस्था लोकांसाठी होईल. शाळेतील मुलांना खिचडीऐवजी दारू दिली, तर ते भारताचे सुदृढ नागरिक बनतील. देशाच्या दृष्टीने हा चांगला निर्णय असेल,’ अशी उपरोधिक टीका बंडातात्या कराडकर यांनी सरकारच्या निर्णयावर केली.
दारूची खुलेआम विक्री होणार असेल तर गांजाच्या शेतीलाही संमती द्या-संभाजी भिडे
‘मी सरकारला अजून एक विनंती करेन की, मंदिरामध्येही दारू उपलब्ध करून दिली, तर भाविकांना देवदर्शनाबरोबर जाताना तीर्थही मिळेल. त्यामुळे त्याचंही कल्याण होईल. त्यामुळे या निर्णयाबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो. महाराष्ट्रातील जनतेला माझी प्रार्थना आहे की, सरकारच्या या धाडसी निर्णयाचं जल्लोषात स्वागत करावं. घरोघरी सडे-रांगोळ्या घालून स्वागत करा आणि हे सरकार रसातळाला जावो, अशी प्रार्थना परमेश्वराकडे करा,’ असं म्हणत बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT