ख्यातनाम संगीतकार विजय पाटील उर्फ राम-लक्ष्मण यांचे नागपुरात निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूर: नागपुरचे सुपूत्र आणि संगीतकार राम-लक्ष्मण (Ram-Laxman) जोडीतील संगीतकार लक्ष्मण उपाख्य विजय पाटील (Vijay Patil) यांचे नागपुरात काल रात्री एक वाजेच्या सुमारास निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. . ते आपल्या मुलासह नागरपूरमध्येच राहात होते. येथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा पाटील, मुलगा संगीतकार अमर पाटील, सुना, नातवंडे, दोन मुली असा आप्त परिवार आहे. राम कदम उपाख्य राम व विजय पाटील उपाख्य लक्ष्मण अशी राम-लक्ष्मण ही जोडी होती.

ADVERTISEMENT

राजश्री फिल्मसच्या ‘एजंट विनोद’ हा या जोडीचा पहिला चित्रपट होता. 1976 साली आपले जोडीदार राम यांच्या मृत्यूनंतरही लक्ष्मण यांनी राम-लक्ष्मण याच नावाने संगीत दिले. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून ते खूप गाजले. आजपर्यत त्यांनी सुमारे 75 हिंदी, मराठी व भोजपुरी चित्रपटांना संगीत दिले आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील ‘हम से बढकर कौन’, ‘सुन सजना’, ‘दिवाना तेरे नाम का’, ‘पोलिस पब्लिक’, ‘हंड्रेड डेज’, ‘दिल की बाजी’ ‘पत्थर के फुल’ आदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. तसंच उषा मंगेशकर यांच्याकडून त्यांनी अनेक गाणी गाऊन घेतली आहेत. 1989 च्या ‘मैने प्यार किया’ या सलमान खान अभिनीत चित्रपटाने त्यांना अमाप यश आणि नाव दिले. यासाठी त्यांना फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. त्या नंतरचे ‘हम आप के है कौन’ व ‘हम साथ साथ है’ हे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले.

हे वाचलं का?

चांगले उपचार मिळाले असते तर…; फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर अभिनेता राहुल वोहराचं निधन

रामलक्ष्मण यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 रोजी झाला होता. रामलक्ष्मण यांचं मूळ नाव विजय पाटील असं आहे. परंतु संपूर्ण सिनेसृष्टीत ते रामलक्ष्मण या नावानेच ओळखले जात होते. रामलक्ष्मण यांनी सर्वाधिक काम राजश्री प्रॉडक्शन सोबत केलं होतं. हम आपके है कोन, हम साथ साथ है, मैने प्यार किया यासारख्या अतिशय गाजलेल्या चित्रपटातील सदाबहार गाण्यांना संगीत हे विजय पाटील यांनीच दिलं होतं. या सिनेमातील अनेक गाणी त्यांच्या संगीतामुळेच अजरामर झाली आहेत.

ADVERTISEMENT

दरम्यान, त्यांना त्यांच्या उत्कृष्ट संगीतसाठी फिल्मफेयर अवार्डसह अनेक मानाचे पुरस्कार सुद्धा मिळाले होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय सिनेसृष्टीने आज एक दिग्गज संगीत दिग्दर्शक गमावला आहे.

ADVERTISEMENT

‘जांभूळ आख्यान’चे संगीतकार अच्युत ठाकूर यांचं निधन

लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांची सुरूवात नागपुरातील गाजलेल्या कादर आॅर्केस्ट्रातून झाली होती. एम. ए. कादर हे त्यांचे बालमित्र. बाबा स्वामी, एम. ए. कादर व विजय पाटील हे तिघे आॅर्केस्ट्रात गायचे. काही वर्षांनी ते मुंबईला निघून गेले. त्यांच्या जाण्याने एक हृदयस्थ मित्र गमावला अशी शोकसंवेदना कादर यांनी व्यक्त केली आहे.

‘एकदा झालेली मैत्री ते शेवटपर्यत जपत. त्यांनीच मला ‘अंतिम न्याय’ व ‘फौज’ या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. कादर संगीत अकादमीचे उद्घाटन आम्ही त्यांच्या हस्ते केले होते.’ अशी आठवण कादर यांनी सांगितली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT